स्वामी विवेकानंद यांचा जीवनातील 3 प्रेरक प्रसंग

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893  साली अमेरिका येथे भरलेल्या धर्म सभेत भाषण केल होत. त्यांचं भाषण अमेरिकेत खूप गाजले. तिकडील वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. असे स्वामीजी घडले ते त्यांचा संस्कारामुळे, गुरुंमुळे आणि आयुष्यात आलेल्या अनुभवातून. आज असेच त्याचा जीवनातील काही प्रेरक प्रसंग तुम्हाला खूप काही शिकवायला पुरेसे आहे.

​1.मनःशांती मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे

अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करून थकलेला एक तरुण स्वामी विवेकानंद यांचा जवळ आला आणि म्हणाला, "स्वामीजी तासन्  तास बंद खोलीत बसून मी ध्यान धारणा करतो, परंतु माझा मनाला शांती लाभत नाही."

त्यावर स्वामीजी म्हणाले, "सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव, आपल्या जवळपास राहणाऱ्या दुःखी, रोगी व भुकलेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर."

यावर त्या तरुणाने त्यांना, "एखादा रोग्यासी सेवा करताना मीच आजारी पडलो तर?" असा प्रश्न विचारला.

विवेकआनंद म्हणाले, "तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते, म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नये. हाच मनःशांती मिळवण्याचा जवळचा व उत्तम मार्ग आहे."

2.संकटांना घाबरू नका

बनारस मध्ये असताना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पाय वाटेने चालले होते लाल तोंडाची माकडे त्यांचा पाठीमागे लागली. त्यांचा पासून स्वतःचा बचाव करण्या साठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेना.

इतक्यात पळणाऱ्या स्वामीजींना कुठुन तरी एक साधूचा आवाज ऐकू आला. 'पळू नको! त्यांना सामोरे जा!', असे ते त्यांना सांगत होते.

त्यांचा सांगण्यानुसार स्वामीजी एकदम वळले आणि माकडांकडे तोंड करून खंबीरपणे उभे झाले. मग काय आश्चर्य ! सर्व माकडे मागे सारली आणि पळून गेली. या अनुभवातून स्वामीजींना मोठा धडा मिळला होता की, संकटांना घाबरून पळू जाण्यापेक्षा त्यांना धैर्याने तोंड दिले पाहिजे.

तात्पर्य: संकटांना कधीही घाबरून नये . त्यांना धैर्या ने सामोरे जाता आले पाहिजे.


3.ठाम निर्धार

एकदा जयपूरला असतांना स्वामी विवेकानंद पाणिनीचे संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी तेथील एका प्रसिद्ध संस्कृत पंडिताकडे जात होते. पंडितजींनी त्यांना पहिले सूत्र नाना प्रकारे समजावून सांगितले, तरीही त्यांना ते येत नव्हते.

तीन दिवस सततच्या प्रयत्नांनंतर पंडितजी म्हणाले, "पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा मी आपल्याला एकही सूत्र समजावून देऊ शकलो नाही. त्यामुळ माझा जवळ शिकण्याने आपल्याला लाभ होईल, असे मला वाटत नाही,"

पंडितजींचे बोलणे ऐकून वेवेकानंदांना फार वाईट वाटले. जोवर या सूत्राचा अर्थ समजणार नाही, टॉवर जेवण-खाण सर्व बंद! असा ठाम निर्धार त्यांनी केला. त्यांनी एकाग्र चित्ताने त्या सूत्रातील भाष्य समजून घेतले. नंतर ते पंडितजींकडे गेले. त्यांच्याकडून सूत्रांचे सुरेख आणि सहज स्पष्टीकरण ऐकून पंडितजींनाही आश्चर्य वाटले.

तात्पर्य: ठाम निर्धार केला की, कुठलीही गोष्ट असाध्य नसते.

आवडले का हे प्रेरक प्रसंग आवडले असतील तर कॉमेंट करून कळवा. आता तुम्ही पोस्ट लाईक करू शकता. या साठी प्रत्येक पोस्टच्या नावा खाली आणि पोस्ट च्या खाली फेसबुक लाईक बटन दिसत आहेत त्याला क्लीक करा फक्त धन्यवाद.

إرسال تعليق

7 تعليقات

  1. संदीप सुर्यवंशी4 يناير 2017 في 11:03 م

    खरच अप्रतिम आहे आज चा लेख
    वाचुन मन सुखावते मित्रा

    ردحذف
  2. खरच अप्रतिम आहे आज चा लेख
    वाचुन मन सुखावते मित्रा

    ردحذف
  3. धन्यवाद संदीप, कॉमेंट करून मला आणखी चांगले काम करायला प्रोत्साहन देण्यासाठी.

    ردحذف
  4. Khopch chhan..

    ردحذف
  5. धन्यवाद स्मिताजी

    ردحذف
  6. खरंच किती सुंदर आणखी माहिती टाका

    ردحذف
  7. Khupch prernadayi short stories ani vichar ahet yancha upyog nkiich ayushyat hoil

    ردحذف