बिजनेस लोन आणि प्रोजेक्ट लोन या दोन कर्जाचा घोळ ....

कर्जाचा घोळ....

तुम्हाला नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज हवं असतं. तुम्ही बँकेत जाता business loan हवंय म्हणता, आणी बँकेचे कर्मचारी तुम्हाला तीन वर्षाचा IT Return, सध्याच्या व्यवसायाचे ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट मागतात. यातलं तुमच्याकडे काहीच नसतं कारण तुम्ही अजुन व्यवसायंच सुरु केलेला नसतो. IT Return नसेल तर business loan मिळु शकत नाही असे बँक कर्मचारी मख्खपणे सांगतात. मग आपण निराष होऊन घरी परततो, बँकेच्या नावाचे तासभर शिमगा करतो आणी बँक कर्ज देत नाही या निराशेत व्यवसायाचा विचारंच रहीत करतो..... असं कित्येकांच्या बाबतीत झालेलं आहे..... हो ना???

व्यवसाय अजुन सुरुच झालेला नसताना व्यवसायाच्या डिटेल्स कशा द्यायच्या हा प्रश्न आपण बँकेला विचारतंच नाही. त्यांच ऊत्तर अंतीम मानुन आपण माघारी फिरतो.

तुम्हाला बँकेकडुन योग्य माहिती मिळत नाही हे मान्य पण बँकेचे कर्मचारी सुद्धा चुकीची माहिती देत नसतात हेही खरे आहे..... कारण घोळ शब्दांचा आहे. बिझनेस लोन आणी प्रोजेक्ट लोन या दोन शब्दांचा

बिझनेस लोन म्हणजे नविन व्यवसायासाठी लोन असं आपल्याला वाटतं. पण तसं नाही. सोप्या भाषेत बिझनेस लोन म्हणजे सध्याच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी लोन. किंवा व्यवसायीकासाठी लोन. मग अशावेळेस बँक व्यवसायाच्या डिटेल्स मागणारंच. पण आपल्याला बिझनेस लोन शब्दाचा योग्य अर्थ माहित नसल्यामुळे गैरसमज होतो. आणि नविन व्यवसायाला कर्ज मिळत नाही असा समज करुन घेतो.

नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी जे कर्ज असतं त्याला प्रोजेक्ट लोन म्हणतात. कोणतिही नविन मॅन्युफॅक्चरींग वा सर्वीस ईंडस्ट्री सुरु करण्यासाठी जे कर्ज हव असतं त्याला प्रोजेक्ट लोन म्हणतात.... (ट्रेडींग व्यवसाय यात येत नाही.)

हा सगळा शब्दांचा घोळ आहे, बँकींग प्रणालीतले शब्द आपल्याला माहित नसतात. चुकीचे शब्द वापरल्यामुळे आपल्याला योग्य माहिती मिळत नाही. आणी अंततः आपण व्यवसायाचा विचारंच रहित करतो.

असं होऊ देऊ नका

यापुढे तुम्ही ज्यावेळेस नविन व्यवसायासाठी कर्ज मागायला बँकेत जाल त्यावेळेस बिझनेस लोनबद्दल नाही प्रोजेक्ट लोन बद्दल माहिती विचारा. बँक तुम्हाला व्यवसायाची माहिती विचारेल आणी प्रोजेक्ट रिपोर्ट जमा करायला सांगेन. तुमची व्यवसायाची पहिली पायरी योग्य पद्धतीने मार्गी लागेल.

लेखक:- श्रीकांत आव्हाड
अहमदनगर
7744034490

संदर्भ:- उदोजक मित्र

إرسال تعليق

2 تعليقات

  1. हि माझी पोस्ट आहे ... एक तर डिलीट करा किंवा नावाने पब्लीश करा... नाहीतर काॅपीराईट भंगाची , आर्टीकल चोरीची कारवाई केली जाईल

    श्रीकांत आव्हाड
    अहमदनगर
    ९७६४०७०७४६

    ردحذف
  2. Sry sir , तुम्ही सुचवलेला बद्दल आम्ही केलेला आहे

    ردحذف