सॅमसंग (SAMSUNG) कंपनी बद्दल थक्क करणारे फॅक्टस | UNKNOWN FACTS ABOUT SAMSUNGMARATHI


मित्रांनो आज सॅमसंग कंपनी ला कोण ओळखत नाही. ते आपल्या सुबक, उच्च आणि दर्जेदार स्मार्टफोन्स मुळे प्रसिद्ध आहेत. सॅमसंग हा अप्पल कंपनी सारखे फक्त महागडे स्मार्टफोन बनवत नाही तर , तो अगदी दीड हजाराचा CDMA पासून ते 60 हजाराचा हायटेक स्मार्टफोन बनवण्या साठी प्रसिद्ध आहेत. पण ही कंपनी फक्त स्मार्टफोनच बनवते असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख वाचा, तुम्हाला विश्वास नाही बसणार हा सॅमसंग किती मोठा आणि विशाल आहे ते.

सॅमसंग चे नाव


samsung चे लोगो

सॅमसंग नावांमध्ये खूप मोठा अर्थ दडला आहे. सॅमसंग हा एक कोरियन शब्द आहे. यात सॅम म्हणजे तीन आणि संग म्हणजे तारे असा होता. म्हणून सॅमसंग म्हणजे three star थ्री स्टार असा होतो. जो कोरिया मध्ये खूप मोठं किंवा शक्तीशाली गोष्टींसाठी वापरले जाते. आज ही कंपनी त्याचा नावाला शोभेल अशीच तर घडली आहे.

कंपनीची सुरुवात आणि विस्तार

सॅमसंगची नूडल स्टोर

ही गोष्ट कोणाला खरी वाटणार नाही पण सॅमसंग ही कंपनी सुरुवातीला नूडल्स विकायची. कंपनी ची स्थपना 1938 मध्ये ब्यून्ग चूल (Byung Chul) यांनी केली. ते नूडल्स सोबत माशे फळ भाज्या इत्यादी गोष्टी विकत असत. जवळपास १२ वर्षे त्यांनी हाच व्यवसाय केला. १२ वर्षा नंतर म्हणजे १९५० ला ते प्रथमच वेगळ्या क्षेत्रात उतरली.

सॅमसंगने 1950 मध्ये प्रथमच इनशॉरन्स आणि रिटेल क्षेत्रात पाऊल ठेवलं. मग त्यातल्या यशानंतर तब्बल 20 वर्षा नंतर म्हणजेच 1970 मध्ये प्रथमच ती इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उतरली त्यांनी त्याचं प्रथम tv हा 12 इंचाचा Black अँड white tv बाजारात उतरवला, आणि ते हळू हळू इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील दिग्ग्ज म्हणून नावारूपाला येत गेली.

सॅमसंग चा पहिला tv

त्यांनी 1983 च्या सुमारास त्यांनी त्यांचा पहिला कॉम्प्युटर बाजारात विक्रीसाठी आणला. पण त्यांना खर यश मिळालं ते 1990 मध्ये, त्या वर्षा पासून कंपनी ची वाढ झपाटयाने होऊ लागली, ते एका मागून एक यशाचे पर्वत सर करत गेले शेवटी सॅमसंग ही 2011 साली जगातील सर्वात जास्ती मोबाईल फोन बनवणारी आणि विकणारी कंपनी बनली.

कंपनी ची व्याप्ती


samsung चे सध्या चे मुख्यालय

सॅमसंगची सुरुवात फक्त 40 कर्मचार्यां सोबत झाली होती. पण सध्या 4 लाख 89 हजार कर्मचारी काम करतात. ही संख्या गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि अप्पल या तीनही कंपनी चे मिळून होणाऱ्या कर्मचारांपेक्षा जास्ती आकडा आहे.

ही कंपनी 80 वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.  ही अवजड गोष्टी बनवणारी अग्रगण्य कंपनी असून दर वर्षी 30 मोठे जहांज Ships बनवते. त्यांचं ship बांवण्याची जागा जवळपास 400,000,000 स्क्वेर फूट च आहे, म्हणजे 40 कोटी स्क्वेर फूट, याला आणखी सोप्पे करू 40 कोटी स्क्वेर फुटामध्ये 5204 एवढे क्रिकेट ग्राऊंड बनवता येतिल.

जगात विकल्या जाणाऱ्या सर्व फोन मध्ये  22.4 टक्के फोन हे सॅमसंगचे असतात. अप्पल च्या सर्व फोन मध्ये वापरले जाणारे प्रोसेसर, रॅटीना डिस्प्ले हे सॅमसंगच बनवते. आज जगातील 70 टक्के फोन्स मध्ये वापरले जाणारे प्रोसेसर म्हणजेच चिपसेट आणि रॅम हे सॅमसंगने बनवलेले असतात, आणि जगात बनवल्या जाणाऱ्या सर्व AMOLED डिस्प्ले मध्ये 95 टक्के हे सॅमसंगच बनवते.


सॅमसंगने  बांधलेला बुर्ज खलिफा


सॅमसंगनेच जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा बांधली आहे. जी तब्बल 828 मीटर एवढी उंच आहे. या शिवाय Taipai 508 मीटर। petronas tower 451 मीटर या पण सॅमसंगनेच बनवलेलं आहेत.

सॅमसंग बद्दल आणखी काही फन फॅक्टस


  • हि कंपनी  वर्षी एक नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनाइजेशन सॅमसंग मेडिकल सेंटर ला 100 मिलीयन डॉलर डोनेट करते.

  • हि कंपनी कोरियचा संपूर्ण GDP च्या 17 टक्के एवढ आहे.

  • जगभरात प्रत्येक मिनिटाला 100 सॅमसंग tv विकले जातात.

  • सॅमसंग ची एक उप कंपनी टेकविन नावाची कंपनी साऊथ कोरिया साठी फायटर प्लेन, हेलीकॉप्टर, जेट इंजीन आणि सैनिकांसाठी कास सुविधा असलेल्या मोबाईल फोन बनवते.

  • साऊथ कोरिया मधील सर्वात मोठा थीम पार्क हा देखील या कंपनी ने बनवले असून ते पार्क त्यांचांच मालकीचा आहे.

यातून एक गोष्ट शिकायला मिळाते ती म्हणजे मोठ्या वाटणाऱ्या गोष्टींची सुरुवात लहानच झाली होती. म्हणून अगोदर सुरुवात तरी करा लहान असेल तरी ती पुढे प्रचंड मोठी होऊ शकते.

मित्रांनो कसा वाटला हा लेख आवडला असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा.  तुमच्या मित्रां सोबत या लेखाला शेर करा. आणि atoz मराठी च्या फेसबुक पेज ला लाईक करा धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या