जगदीशचंद्र बोस - मराठी जीवन चरित्र । Jagdish Chandra Bose marathi biography


जगदीश चंद्र बोस

आज सर जगदीश चंद्र बोस यांची जयंती होय. जगदीश चंद्र हे एक मल्टी-टॅलेंटेड अशे व्यक्तिमत्व होते. ते हे एक जीवशास्त्रज्ञ (biologist), भौतिकशास्त्रज्ञ (physicist), वनस्पतीशास्त्रज्ञ (botanist), तसेच पुरातत्त्वज्ञ (archaeologist) होते. त्यांनी झाडांमध्ये मानव आणि इतर जिवां सारखी संवेदना असते, झाडे पण आनंदी, दुखी होतात आणि त्यांना देखील वेदना होतात हे सिद्ध केलं.

जगदीश चंद्र यानी प्रथम बिनतारी (wireless) संदेश पाठवणारा यंत्र विकसित केला होता पण या यंत्राचे श्रेय त्याना मिळाले नाही. आजची मॉडर्न वायरलेस टेकनॉलॉजी त्या अविष्कारावर आधारलेली आहेत, त्यांनी नेमेलाइट रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली.

जन्म व बालपण

पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सबडिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.

जगदीश चंद्र बोस यांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.

बोस यांच्या वडिलांना भारतावर सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीविषयी तिरस्कार वाटायचा. पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या प्रकारे लहान मुलांना शिकवलं जायचं त्याच पद्धतीनं भारतात अगदी एकांगी पद्धतीनं शिक्षण दिलं जातं असं वाटत असल्यामुळे बोसच्या वडिलांनी आपल्या मुलाला एका भारतीय पद्धतीच्या साध्या शाळेत पाठवलं.

शाळेत जगदीश चंद्र बोस यांनी इतकी विलक्षण प्रतिभा दाखवली की पुढचं शिक्षण भारतात घेण्यापेक्षा बोसनी इंग्लंडला जावं आणि भारतात इंग्रजांसाठी काम करणारा अधिकारी म्हणून काम करण्यासाठीची परीक्षा द्यावी असं त्याच्या शिक्षकांचं मत होतं. पण बोसच्या वडिलांना हे अजिबात पसंत नव्हतं.

शिक्षण

इ.स. १८८५ साली त्यांनी लंडन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.) ही पदवी प्राप्त केली. याबरोबरच सृष्टिविज्ञान विषयातील ट्रायपॉस (Tripos) ही पदवी मिळवून ते भारतात परतले. भारतात परतल्यानंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य करू लागले. हे उच्च पद धारण करणारे ते पहिले भारतीय होते. या उच्च पदावर काम सुरू केल्यानंतर त्यांना समजले की, ब्रिटिश प्राध्यापकांपेक्षा आपल्याला कमी वेतन देण्यात येत आहे. या अपमानास्पद वागणुकीला उत्तर म्हणून बोसनी तीन वर्षं तिथे काम करूनही आपल्या पगाराला हातसुद्धा लावला नाही. अशा प्रकारे, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवणे हा सत्याग्रहाचाच एक प्रकार होता. पण त्यांचं अफाट ज्ञान आणि शिकवायची उत्कृष्ट पद्धत यामुळे त्यांच्या तासांना विद्यार्थी अगदी उत्साहानं हजर राहायचे. त्यांचा वर्ग अगदी गच्च भरलेला असे. शेवटी कॉलेजच्या अधिकारी वर्गालाच नमतं घ्यावं लागलं, आणि तीन वर्षांनी का होईना पण बोसची तिथे पूर्णपगारी नेमणूक करण्यात आली.

संशोधन

हेन्रिच हटर्झला पहिल्यांदा सापडलेल्या बिनतारी लहरींचा म्हणजेच रेडिओ वेव्हजचा अभ्यास पुढे आपल्याच जगदीशचंद्र बोस यांनी १८९४ साली सुरू केला. त्याच वर्षी दुर्दैवानं अतिशय प्रतिभावान असलेला हटर्झ वयाच्या ३७ व्या वर्षीच मरण पावला होता.

बिनतारी लहरींच्या बाबतीतलं बोस यांचं मुख्य संशोधन म्हणजे जास्त लांबीच्या लहरींचा प्रत्यक्ष संदेशवहनासाठीच्या अभ्यासासाठी वापर करणं अवघड आहे हे सिद्ध करणं. १८९४ सालच्या नोव्हेंबर महिन्यात कलकत्त्यामध्ये बिनतारी लहरींचा वापर करून बोस यांनी छोट्या प्रमाणातला दारूगोळा दूरवरून उडवून दाखवला, तसंच एक घंटाही वाजवून दाखवली. अशाच प्रकारे बिनतारी लहरींचा वापर करून संदेशवहन करता येईल अशा आशयाचा एक प्रबंधही त्यांनी लिहिला.


नंतर दोन वर्षांनी मार्कोनीनं बिनतारी संदेशवहनाचे प्रयोग सुरू केले. त्यावेळी बोस यांनी आर्थिक कारणांसाठी आपल्याला बिनतारी लहरींच्या अभ्यासामध्ये रस नसून त्यासंबंधीचं मूलभूत संशोधन पुढे न्यायचं असल्याचं सांगितलं. नंतरच्या अनेक इतिहासकारांनी बोस यांनाच बिनतारी संदेशवहनाचं खरं श्रेय मिळायला हवं होतं असं नमूद केलं आहे. पण अर्थातच व्यवहारचतुर असलेल्या मार्कोनीनं आपल्या नावावर ते लाटलं असा अनेक जण आरोप करतात. अनेक विदेशी ग्रंथांतून आज बिनतारी संदेश यंत्रणेचा संशोधक म्हणून मार्कोनीची प्रशंसा केली जाते; पण खरे श्रेय मात्र बोस यांनाच आहे. अर्थात त्यामागे बोस यांनी न घेतलेल्या पेटंटचा वाद आहेच.

वनस्पती शास्त्रातील संशोधन

काही काळानंतर आपले बिनतारी लहरींचे प्रयोग पुढे नेत असताना बोसना काही विलक्षण गोष्टी सापडल्या. ज्याप्रमाणे धातूच्या वस्तू बिनतारी लहरींना आपल्याकडे आकर्षून घेतात त्याच पद्धतीनं जीवसृष्टीमधल्या सजीव गोष्टींनासुद्धा त्यांचं अस्तित्व जाणवतं असं बोसांच्या लक्षात आलं.

त्यातही वनस्पतींना या लहरींचं भान असतं आणि त्या लहरींमुळे त्यांच्यात फरक पडू शकतो असंही बोस यांच्या संशोधनात दिसून आलं. तसंच याहून वेगळा प्रयोग म्हणजे जेव्हा वनस्पतींना हरितद्रव्याचा खुराक दिला जातो तेव्हा त्या अगदी माणूस किंवा प्राणी यांच्यासारखेच भूल दिल्यासारख्या वागायला लागतात असं बोस यांच्या लक्षात आलं.

हा प्रयोग करताना बोसनी एका अतिशय मोठ्या पाईन वृक्षाला हरितद्रव्य पुरवलं आणि नंतर त्या वृक्षाला नीट कापून दुसरीकडे परत एकदा त्याचं रोपण केलं. सर्वसामान्यपणे जेव्हा एखादं झाड मूळापासून जमिनीतून उपटलं जातं तेव्हा त्याला प्रचंड वेदना होतात. एखाद्या गरीब आणि मुक्या माणसाला किंवा जनावराला खूप त्रास दिल्यावर तो ते नाईलाजानं निमूटपणे सहन करतात पण त्यानं होणारा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तसंच कुठल्याही झाडाच्या बाबतीत होत असतं असं संशोधकांनी वारंवार सांगितलेलं आहे.
Bose invented the Crescograph an electrical instrument that could measure the growth of a plant.


त्यामुळे या पाईन वृक्षाच्या बाबतीतसुद्धा तेच होणार यात बोसना काही शंका नव्हती. पण गंमत म्हणजे हरितद्रव्याचा पोषक खुराक मिळाल्यावर हा वृक्ष आनंदानं त्याच्यावर ताव मारत होता, आणि त्याची मुळं जमिनीतून उपटल्यावरही त्याला त्याची फिकीर नव्हती. आधी म्हटल्याप्रमाणे जणू त्याला बोसनी भूलच दिली होती!

बोस यांनी आपल्या निरीक्षणांविषयी सात शोधनिबंध लिहून ते रॉयल सोसायटीकडे पाठवले. पण काही काळानं बोस यांच्या संशोधनाविषयी विनाकारण संशय निर्माण करणं तसंच त्यांच्या संशोधनाचं श्रेय स्वत:च लाटायचे प्रयत्न करणं असे प्रकार काही जणांनी सुरू केले. त्यामुळे स्वत:ची इच्छा नसूनही बोस यांना आपल्या संशोधनाविषयी एक पुस्तक लिहिणं भाग पडलं. १९०२ साली 'रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन-लिव्हिंग' या नावानं ते प्रसिद्ध झालं. विज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला एक निष्कर्ष बोसनी काढला तो म्हणजे, झाडांना किती प्रमाणात कार्बन डायऑॅक्साईडची गरज असते या संदर्भातलं संशोधन हा होता. झाडांना अमर्याद प्रमाणात कार्बन डायऑॅक्साईड दिला तरी ती चांगलीच राहतात, तसंच एकदम टवटवीत असतात असं तोपर्यंत मानलं जायचं. पण यात तथ्य नसून प्रमाणाबाहेर कार्बन डायऑॅक्साईड मिळाल्यावर झाडं गुदमरून जातात, आणि ज्याप्रमाणे गुदमरलेल्या अवस्थेमधल्या माणसांना आणि प्राण्यांना पूर्ववत स्थितीमध्ये आणण्यासाठी ऑॅक्सिजन पुरवावा लागतो त्याचप्रमाणे अशा अवस्थेतल्या झाडांनाही ऑॅक्सिजन पुरवावा लागतो असं बोसनी दाखवून दिलं.

बोस यांची शास्त्रज्ञ म्हणून जगभर ख्याती पसरली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या पदासाठी निवड झालेले ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे मोल लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने इ.स. १९१७ मध्ये त्यांना 'सर' या किताबाने सन्मानित केले. तेव्हापासून ते 'सर जगदीशचंद्र बोस' या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे समकालीन भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांच्यापेक्षा बोस ३० वर्षांनी मोठे होते. योगायोग असा की, रामन ज्या वित्तीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेस बसले होते, त्या परीक्षेतील पदार्थविज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी तयार केली होती.

२३ नोव्हेंबर, १९३७ रोजी बिहारमधील गिरिडीह येथे बोस यांची प्राणज्योत मालवली. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी बोस संशोधन संस्थेच्या निदेशकास सांगितले होते की, 'मृत्यूनंतर माझी उरलीसुरली संपत्ती विकावी व त्यातून मिळणारे धन संशोधन व सामाजिक कार्यासाठी वापरले जावे.' त्यांनी स्थापन केलेली 'बोस संशोधन संस्था' सर जगदीशचंद्र बोस यांचे नाव उज्ज्वल करत असून यशाच्या उच्चतम शिखरांवर आरूढ आहे. दिवसेंदिवस या संस्थेच्या नावलौकिकात वाढ होत आहे.

संस्थास्थापना आणि लेखन

जगदीश चंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले.

जगदीश चंद्र बोस यांनी लिहिलेली पुस्तके

इरिटेबिलिटी ऑफ प्लँट्स
इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लँट्स
ट्रॉपिक मुव्हमेंट ॲन्ड ग्रोथ ऑफ प्लँट्स
दि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लँट्स
प्लँट रिस्पॉन्स (१९०६)
दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस
दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लँट्स
रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग ॲन्ड नॉन लिव्हिंग (१९०६)
लाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लँट्स (भाग १ ते ४)

संदर्भ

लेख आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या