रतन टाटा - भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन


रतन टाटा

रतन टाटा हे टाटा समूहाचे ५ वे अध्यक्ष होय. १९९१ मध्ये जे.आर.डि. टाटा निवृत्त झाले आणि रतन टाटा यांचाकडे अध्यक्ष पदाची जबाबदारी आली. सुमारे 150 वर्षांची उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा अध्यक्ष होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुक़ुट आहे. कारण टाटा.. भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढय़ांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती!

ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता. या बाबी टाटा गु्रपला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रुपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रुपचा विस्तार केला. रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळसळते चैतन्य निर्माण केले. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटा यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे.

जन्म

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी सुरत येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल आणि आईचे नाव सोनू असे आहे. टाटा हे पारशी धर्माचे आहेत. रतन टाटा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले, हे खरे असले, तरीही त्यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या सहा वर्षांचे वय असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला.

शिक्षण

रतन टाटा यांनी कॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल (मुंबई) आणि बिशॉप कॉटन स्कूल (शिमला) येथे त्यांचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले. नंतर १९६२ साली ते आर्किटेक्‍ट होण्याची मनीषा बाळगून अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले.आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले.

कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले.

टाटा समूहात प्रवेश

आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. इ.स. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतनजी समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले.

जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच इ.स. १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती.

रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्‍क्‍यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली.

रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. इ.स. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती.

कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली.

रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. इ.स. १९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. इ.स. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली.रतन टाटा यांनी टाटा समूहात सहसा न घडणारी अशी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे पारसी धर्मात न जन्मलेल्या अशा काही गुणी लोकांना त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये अत्युच्च पदांवर आणले. आधीचे मूळगावकर, केरकर, पेंडसे असे काही सन्मान्य अपवाद जरूर होते; पण रतन टाटांनी ते अधिक विस्तारले.

जे. आर. डी. टाटांच्या अति सज्जनपणाचा फायदा घेत वर्षांनुवष्रे कंपनी ही आपली जहागिरी बनवून आपल्याच सग्यासोयऱ्यांबरोबर मनमानी करणारे, कितीही वय वाढले तरी निवृत्त न होणारे टाटा समूहातील मठाधिपती त्यांनी घरी पाठवले. निवृत्तीचे वय ७५ वष्रे निश्चित केले. यात टिस्कोचे रूसी मोदी, टाटा केमिकल्सचे दरबारी सेठ असे सामथ्र्यवान दिग्गज होते. रतन टाटांनी जवळजवळ सर्वच टाटा कंपन्यांतून नवे रक्त आणले आणि लंगडणाऱ्या कंपन्या भरभराटीने धावू लागल्या.

रतन टाटांनी आपणच केलेला नियम काटेकोरपणे पाळला. आपल्या हयातीतच आपला वारस व्यवस्थित रीतीने निवडला आणि स्वत:ही ७५ व्या वर्षी निवृत्त झाले.

रतन टाटा यांची माणुसकी

२oo८ मध्ये २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात हॉटेलमध्ये जखमी झालेल्या सर्वांचे उपचार टाटा यांनीच केले होते. हॉटेल च्या शेजारी असलेल्या दुकानांत जखमी झालेल्या सर्व लोकांना टाटा यांनी मदत केली होती. जोपर्यंत हॉटेल बंद होते तोपर्यंत कर्मचार्यांना त्या दिवसासांचे पूर्ण वेतन दिले जात असे. मुंबईच्या ताज हॉटेलचे बांधकाम जमशेदजी टाटा, ज्यांनी टाटा कंपनीची स्थापना केली होती, त्यांनीच केले होते . हे हॉटेल १९o३ मध्ये ४ कोटी २१ लाख रुपयांच्या बजेट मध्ये बांधले गेले होते.

अपमानाचा बदला

ही कथा आहे 1998 ची….। जेव्हा रतन टाटा हे त्यांची पहिली कार टाटा इंडिका घेऊन आले होते. पण इंडिका वाईट पद्धतीने अयशस्वी झाली. पहिल्या वर्षी लोकांनी कारला नापसंती दिली. कारची खूप कमी विक्री झाली या मुळे इंडिका कार डिव्हिजन विकण्याचा सल्ला कंपनी शिष्टमंडळाने रतन टाटा याना दिला. टाटांनी देखील सल्ला मान्य केलं.

रतन टाटा हे फोर्डचे मुख्यालय डेट्रॉईटला गेले होते हे सांगण्यासाठी की टाटा मोटर्सचे ला तुम्ही विकत घ्या. त्या दिवशी बिल फोर्डने यांनी त्याचा भरपूर अपमान केला होता. त्या दिवशी ते म्हणाले की तुमचे टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनाची खरेदी करुन मी तुमच्यावर उपकार करीत आहे. टाटा यांना बरेचh सुनवण्यात आले की, एखादी गाडी तयार करणे शक्य नसताना तुम्ही या व्यवसायात का आलात? त्यावेळी रतन टाटा यांना खूप वाईट वाटले. त्याच रात्री, ते संपूर्ण टीमसह डेट्रॉईटवरून मुंबईला परतले. ते हट्टी स्वभावाचे होते. टाटा मोटर्सवर वर स्वतंत्र वेळ दिला. काही दिवसांनंतर टाटा मोटर्सने चांगली सुरुवात केली. काही वर्षांनी टाटा मोटर हि खूप नावारूपाला आली.

परंतु बिल फोर्डची कंपनी कर्जात बुडाली. २oo९ साली फोर्ड कंपनी डुबण्याच्या काठावर आली तेव्हा टाटा समूहाने त्यांना एक प्रस्ताव पाठवला की आम्ही तुम्हाला खरेदी करतो. अगदी त्याचप्रमाणे, फोर्डची संपूर्ण टीम डेट्रॉइटहून मुंबईला आली आणि म्हणाली, "आपण आमच्या जैगुआर लैंडरोवर खरेदी करून आमच्यावर उपकार करीत आहात." रतन टाटा यांनी जैगुआर लैंडरोवरला ९६oo कोटी रूपयांत विकत घेतले.व्ययक्तिक जीवन

रतन टाटा चार वेळा प्रेमात पडले, पण ते विवाहित नाही. आणि एकदा तर त्यांचे लग्न होणारच होते. वास्तविक, रतनजी अमेरिकेत शिकत असताना ते एका मुलीच्या प्रेमात पडले, व दोघे ही लग्नासाठी तयार झाले होते. त्यांच्या आजीच्या आजारामुळे ते भारतात आले परंतु त्यांची प्रेमिका भारत-चीन युद्धामुळे फारच घाबरलेली होती आणि भारतात आली नाही. आणि काही दिवसांनंतर, त्यांच्या प्रेमिकेने अमेरिकेमध्ये दुसऱ्या कोणा बरोबर लग्न केले.

सारांश


रतन टाटा यांनी १९९१ ते २०१२ च्या आपल्या २१ वर्षाच्या कारकिर्दीत कंपनीला सर्वोच्च पातळीवर आणले आहे. त्यांच्या कारकिर्दीत कंपनी चा नफा हा ५ पटीने वाढला. सुरवातीला त्यांनी जे काही निर्णय घेतले ते त्यांनी सिद्ध करून दाखवले होते. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी एका पाठोपाठ खरेदी केल्या. या भरारीने देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.

'मोठी स्वप्न पाहाणे आणि ती प्रत्यक्षात आणणं' हा गुरुमंत्र रतन टाटांनी दिला आहे. या स्वप्नांमधून 'इंडिगो' आणि 'नॅनो'ची निर्मिती झाली. भारतातच कार तर जगभरात कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी दाखवून दिले आहे. यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. MH NMK नोकरी माहिती केंद्र | Maha NMK jahirat
    नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी मिळविण्याचे केंद्र म्हणजे https://mhnmk.com

    उत्तर द्याहटवा