ट्राजेडी किंग दिलीप कुमार- biography in marathi

दिलीप कुमारनाव: दिलीप कुमार उर्फ युसुफ खान
जन्म:11 डिसेंबर 1922
वडील: लाल गुलाम सरवर
माता: आयशा बेगम

परिचय:


दिलीप कुमार हे महान हिंदी चित्रपट अभिनेता आहेत. 1944 मध्ये बॉम्बे टॉकीज निर्मित ज्वार भाटा या चित्रपटा पासून त्यांनी यांनी आपल्या करियर ची सुरुवात केली. त्याचं फिल्मी करियर जवळपास 6 दशके चालले त्यात त्यांनी 60 च्या वरती सिनेमात काम केलं आहे. त्यांनी action, हिस्टरी, रोमँटिक, कॉमेडी अश्या बऱ्याच प्रकारच्या सिनेमात काम केलं आहे.

आपल्या करिअर मध्ये दिलीप कुमार यांनी 9 फिल्म फेअर अवार्ड आपल्या नावे केली. सगळ्यात जास्ती फिल्म फेअर अवार्ड मिळवण्याचा रिकॉर्ड आज पण त्यांचाच नवे आहे. एवढंच नाही तर 1954 मध्ये बेस्ट ऍक्टर साठी साठी फिल्म फेअर जिंकणारे ते पहिलेच कलाकार होय.

भारत सरकार ने त्यांचा चित्रपट क्षेत्रातील योगदान पाहता 1991 मध्ये पद्म भूषण आणि 2015 मध्ये पद्म विभूषण देऊन गौरव केला. त्यांना 1994 मध्ये सिने जगतातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार 'दादासाहेब फाळके' देऊन गौरवण्यात आले. पाकिस्तान सरकार ने देखील 1997 मध्ये त्यांना पाकिस्तानातील सर्वोच पुरस्कार निशान-ए-इम्तिआज देऊन सम्मानित केलं आहे.

बालपण आणि प्रारंभिक जीवन


दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तान मध्ये पेशावर येथे झाला.त्यांचा वडिलांचं नाव लाला गुलाम असे होते, त्यांना 12 भावंड होती. त्यांचे शालेय शिक्षण हे नाशिक जवळ कुठला तरी शाळेत झाले. 1930 मध्ये त्यांचं पूर्ण परिवार हे मुबंई येथे राहायला आले. 1940 मध्ये आपल्या वडिलां सोबत काही मातभेदांन मुळे पुणे येथे राहायला गेले.

तिकडे त्यांची ओळख एक कँटीन मालका सोबत झाली, त्यां कँटीन मालकाचे नाव ताज मोहम्मद शाह असे होते. या कँटीन मालकाचा मदतीने दिलीप कुमार यांनी आर्मी क्लब मध्ये एक सँडविच स्टॉल लावला होता. कॉन्ट्रॅक्ट संपल्या नंतर दिलीप कुमार 5000 ₹ ची सेविंग घेऊन आपल्या मुंबई स्थित घरात परतले. मग त्यांनी ठरवले छोटे मोठे काम करून वडीलांच आर्थिक मदत करायच.

करियर ची सुरुवात


1943 मध्ये दिलीप कुमार यांची भेट डॉ.मसानी यांचा सोबत झाली ज्यांनी त्यांना बॉम्बे टॉकीज मधे काम कारायची ऑफर दिली.जी दिलीप कुमार यानी स्वीकार केली. त्यांना तिकडे स्क्रीप्ट राइटिंग च्या कामात मदत करायचे काम मिळाले. ते अधून मधून ऍक्टिंग करत.

पाहिलं ब्रेक


त्या वेळेचे महान कलाकार अशोक कुमार यांना दिलीप कुमार यांची ऍक्टिंग खूप आवडली होती. बॉम्बे टॉकीज ची मालकीण देवीका राणी ह्यांना पण दिलीप कुमार यांची ऍक्टिंग आवडत असे, त्यांनीच त्यांना नाव बदलून दिलीप कुमार ठेवायचा सल्ला दिला होता.शेवटी दिलीप कुमार यांना 1944 साली ज्वार भाटा साठी लीड रोल च ऑफर मिळालं.

सुपरस्टार बनण्याचा प्रवास


ज्वार भाटा फ्लॉप राहीली त्या नंतर 1947 मध्ये त्यांची जुगनू हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा सुपर हिट ठरला या नंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. 1948 मध्ये आलेली शहीद, अनोखा प्यार, मेला सारख्या चित्रपटानीं त्यांना सुपर स्टार बनवल.

1950 मध्ये आलेल्या जोगन, दीदार आणि त्यागी या चित्रपटांनी त्यांना ट्राजेडी किंग म्हणून ओळख दिली. 70 च्या दशकात अमिताभ बच्चन सारखे कलाकार बॉलिवूड मध्ये आले होते. त्या मुळे दिलीप कुमार यांची काही चित्रपट फ्लॉप झाली. म्हणून त्यांनी 5 वर्षांचा ब्रेक घेतला.

5 वर्षांचा मोठा ब्रेक घेऊन ते क्रांती  चित्रपटा पासून नविन अवतारात कमबॅक केलं. नंतर ते आपल्या वयाचा हिशोबाने रोल करू लागले. 1998 मध्ये आलेली किल्ला त्यांच शेवटचं चित्रपट होय.

दिलीप कुमार यांचं वैयक्तिक जीवन.


कुमार यांना सगळ्यात अगोदर कामिनी कौशल सोबत प्रेम झालं होतं.जे यशस्वी झालं नाही. नंतर त्यांना अभीनेत्री मधुबाला यांचा सोबत प्रेम झालं पण यात पण मधूबाला कुटुंबियांच विरोध होता.ज्या मुळे हे प्रेम पण अधुरच राहील. शेवटी त्यांनी सायरा बानो सोबत लग्न केलं. सायरा बानो त्यांचा पेक्षा तब्बल 22वर्षे लहान होती. शेवटी त्यांनी 1980 मध्ये आस्मा बानू सोबत दुसरे लग्न केले जे जास्ती काळ नाही टिकले.

दिलीप कुमार यांचे काही विचार


"इतरांन पेक्षा चांगले बनन्या ऐवजी स्वतः पेक्षा चांगले बना."

"जर तुम्हाला ते मिळवायचं आहे जे अगोदर मिळवलं नाही तर तुम्हाला ते करावं लागेल जे तुम्ही अगोदर केलं नाही."

" एक खरा मित्र तोच असतो जो सगळे जग गेला नंतर येतो."

"येणारी प्रत्येक नवी सकाळ तुम्हाला स्वतः ला जास्ती आणखी चांगले बनवायची आणि चांगले करायची संधी देत असते."

"जीवनात आपल्याला हव्या असलेल्या बहुतांशी गोष्टी हे महाग असतात पण ज्या गोष्टी आपल्याला खुश करतात ते मात्र विनामूल्य असतात जसे की प्रेम, आनंद आणि हसु"

अश्या महान कलाकाराला माझा कडून सलाम.

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर याला तुमच्या मित्रानं सोबत व्हाट्सअँप वर किंवा फेसबुक वर शेर करा. तुम्हाला वरील लेखा बद्दल काही बदल सुचवायचे असतील तर खाली कॅमेन्ट करा. अश्या आणखी जीवन चरित्रं साठी आमच्या फेसबुक पेज लाईक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या