विश्वनाथन आनंद Biography in marathi

विश्वनाथन आनंद




नाव: विश्वनाथन आनंद
जन्म:11 डिसेंबर 1969
वडील:विश्वनाथन अय्यर
आई:सुशीला
विवाह:अरुणा आनंद

परिचय

हा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने पाच वेळा बुद्धिबळातील जगज्जेतेपद मिळवले आहे. (२०००, २००७, २००८, २०१०, २०१२) तो २००७ पासून ते नोव्हेंबर २०१३ पर्यंत तो निर्विवाद बुद्धिबळ जगज्जेता राहिला आहे.

जन्म


आनंद यांचं जन्म हा 11 डिसेंबर 1969 ला तमिळनाडू मध्ये मयीलादुठुरै येथे झाला. त्यांच जन्म झाला नंतर काही दिवसातच त्याचं कुटुंब चेन्नई ला गेले. जेथे आनंद मोठा झाला. त्यांचे वडील दक्षिणी रेल्वे चे सामान्य प्रबंधक होते. आनंद यांची आई सुशीला एक गृहिणी असून बुद्धिबळ खेळाची प्रशिक्षक पण होती. आनंद लहान पणा पासूनच बुद्धीबळा च प्रशिक्षण घेऊ लागला होता.

आनंद चे शिक्षण डॉन बोस्को मैट्रीकुलेशन हायरसेकंडरी स्कुल, एग्मोरे येथे पूर्ण केलं. नंतर चेन्नई च्या लोयोला कॉलेज मधून वाणिज्य शाखेतुन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

आनंद यांच लग्न 9 एप्रिल 2011 ला अरुणा आनंद यांचा सोबत झाला. त्यांना एक मुलगा असून त्याच नाव अखिल आनंद असे आहे.

करियर


जेव्हा जगज्जेतेपदाचे स्थान विभागले गेले तेव्हा आनंद २००० मध्ये फिडे विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकला. तो२००७मध्ये निर्विवाद बुद्धिबळातील जगज्जेता झाला. २००८ मध्ये व्लादिमिर क्रॅमनिकला हरवून त्याने आपली पदवी अबाधित राखली. २०१० मध्ये व्हेसिलिन टोपोलावला हरवून आणि २०१२मध्ये बोरिस गेल्फँडला हरवून त्याने पुन्हा दोनदा आपले विश्वविजेतेपद अबाधित राखले. २०१४ मध्ये मेग्नस कार्लसनयाच्यासोबत नोव्हेंबर २०१३ मध्ये चेन्नई येथे झालेल्या विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

जगज्जेतेपद


२०००


आनंदने २००० मध्ये फिडेचे जगज्जेतेपद नॉक-आऊट स्पर्धेमध्ये जिंकले. अंतिम सामन्यात त्याने स्पेनच्या अलेक्सी शिरोवला ३.५ - ०.५ अशी मात दिली.

२००७


मेक्सिको शहरात झालेली जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून तो २९ सप्टेंबर २००७ रोजी जगज्जेता झाला. आनंदने ह्या स्पर्धेत १४ पैकी ९ गुण मिळविले. तो ह्या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. त्याने इतर स्पर्धकांपेक्षा एक पूर्ण गुण अधिक मिळवला.

२००८


२००८ मधे आनंदने रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकला ६.५ - ४.५ असे हरवून जगज्जेतेपद आपल्यापाशीच ठेवले. क्रॅमनिक व आनंदहे आजपर्यंत ६४ सामने खेळले आहेत.

२०१०


२०१० मध्ये आनंदने बुल्गेरियाच्या टोपोलोवला बुल्गेरियामध्ये ६.५ - ५.५ असे हरवून पुन्हा एकदा जगज्जेतेपद आपल्यापाशीच ठेवले.

२०१२


२०१२ मध्ये आनंदने बोरिस गेल्फँड याला हरवून आपले जगज्जेतेपद कायम राखले.

आनंदला मिळालेले पुरस्कार


भारत सरकार ने आनंदला 1985 मध्ये अर्जुन अवॉर्ड, 1987 मध्ये पद्मश्री 2000 साली पद्मभूषण व 2007 साली पद्मविभूषण हे पुरस्कार दिले आहेत.भारत सरकारचा सर्वोच्च खेळ पुरस्कार - राजीव गांधी खेळ रत्न (१९९१-१९९२) मिळणारा आनंद हा पहिलाच खेळाडू आहे.

25 एप्रिल 2001 साली स्पेन सरकार ने स्पेनचा सर्वोच्च पुरस्कार - Jameo de Oro देऊन आनंदचा गौरव केला. आनंदला आता परियनंत सहा वेळा (१९९७, १९९८, २००३, २००४, २००७, २००८ आणि २००९) चेस ऑस्कर मिळाले आहे.

आनंद च यश हे खूप प्रेरणा दाई आहे.आनंदला मद्रास टायगर पण म्हंटले जाते. आनंदनेच बुद्धिबळ या खेळा कडे फक्त खेळ म्हणून न बघता चांगला करिअर म्हणून बघायला लोकांना भाग पाडले.

वरील माहिती आवडली असेल तर शेर करुन माला प्रोत्साहन द्या. आणि वरील लेखात काही बदल सुचवायचे असल्यास खाली कंमेन्ट करा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या