युवराज सिंग- biography in marathi

परिचय

युवराज सिंह (yuvraj singh) हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. २००० सालापासुन तो भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. २००३ मध्ये त्याने पहिला कसोटी सामना खेळला. २००७ ते २००८ पर्यंत तो भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होता. २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले होते. 2007 चा टी ट्वेन्टी आणि 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंग चा खूप मोलाचा सहभाग होता.वयक्तिक जीवन

युवराज सिंग याच जन्म पंजाब येथे 12 डिसेंबर 1981 मध्ये झाला. युवराज हा माजी वेगवान गोलंदाज आणि पंजबी अभिनेते योगराजसिंग आणि शबनम सिंग यांचा मुलगा होय. त्याचे आई-वडिल घटस्फोटित आहेत. युवराज त्याच्या आई सोबत राहतो. टेनिस आणि रोलर स्केटिंग बालपणामध्ये युवराजच्या आवडत्या क्रीडा होत्या.आणि दोन्ही खेळात तो चांगला होता. त्याने राष्ट्रीय U१४ रोलर स्केटिंग स्पर्धा जिंकली आहे.

पण त्याच्या वडिलांनी त्याचे पदक फेकून दिले आणि स्केटिंग विसरून क्रिकेट वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला सांगितले. ते प्रत्येक दिवस युवराजचे प्रशिक्षण घेई. त्याने चंदीगड मध्ये डि.ए.व्हि. सार्वजनिक शाळेत शिक्षण घेतले. युवराजने मेहंदी सांगा दी आणि पुट सरदार अश्या चित्रपटात बालकलाकार म्हणून सुद्धा काम केले आहे.
युवराज हेजल सोबत

यवराज सिंग चा 12 नोव्हेबर 2015 ला हेजल किच या बॉलिवूड अभिनेत्री सोबत इंगजमेंट झालं व ते नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत.कारकीर्द

युवराज ने एकदिवसीय क्रिकेट मध्ये 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनिया विरुद्ध पदार्पण केले. त्याने त्याची पहिली कसोटी ही 16 ऑक्टोबर 2003 मध्ये नुजीलँड विरुद्ध खेळला. 2005 चे इंडियन ऑइल कप युवराज साठी टर्निंग पॉईंट ठरला. या नंतर युवराज ची टीम मधली जागा भक्कम होत गेली.

तो एक डावखुरा आक्रमक बॅट्समन म्हणून नावारुपाला आला. युवराज जेंव्हा फॉर्मात असतो तेंव्हा आपल्या बॅटिंग ने सर्वांना मंत्र मुग्ध करून टाकतो. युवराज स्पिन गोलंदाची पण करतो शिवाय तो एक उत्तम फिल्डर पण आहे. 2005 साली क्रिकइन्फो (cricinfo) या वेबसाईट अनुसार 1999 नंतर युवराज ने चांगली फिल्डींग करून सगळ्यात जास्ती रन आउट केले.
युवराज सिंग चे सहा सिक्स

युवराजने 2007 च्या टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.कॅन्सर


२०११ मध्ये त्याला त्याच्या डाव्या फुफ्फुसाचा एक कर्करोगाच्या गाठीचे निदान झाले आणि इनडियनॅपलिस मध्ये बोस्टन मध्ये कर्करोग संशोधन संस्था तसेच वैद्यक सुविधा येथे केमोथेरपीच्या उपचार करून घेतला.

मार्च २०१२ मध्ये युवराजला केमोथेरपीच्या तिसऱ्या आणि अंतिम चक्र पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमधुन मुक्त करण्यात आले आणि एप्रिल महिन्यात तो भारतामध्ये परत आला. न्यूझीलँड विरुद्ध् टि-२० सामन्यात सप्टेंबर महिन्यात तो क्रिकेटमध्ये पुन्हा परतला.पुरस्कार


राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१२ मध्ये युवराज सिंह ला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार बहाल केला. 2014 मध्ये युवराज ला "पद्मश्री" पुरस्कार देऊन गौरवन्यात आले.

युवराज ने कैंसर ला देखील मात देऊन आपल्या समोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. अश्या महान खेळाडुला त्याचा पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे युवराज.

हा लेख तुम्हाला आवडला का? आवडले असेल तर शेर करून प्रोतसाहन द्या. या लेखात काही बदल सुचवायचे असल्यास कंमेन्ट करा. धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या