आज एक मे ठीक याच दिवशी 1960 मध्ये ज्या राज्याचा आपल्याला खूप अभिमान आहे. त्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. चला तर आपल्या महान अश्या राज्या बद्दल काही इंटरेस्टिंग फाक्ट्स जाणून घेऊया. नक्कीच यातले बरेच फाक्ट्स तुम्हाला माहिती नसतील आहे.
महाराष्ट्र राज्याबद्दल थोडक्यात माहिती
- 1 मे 1960 रोजी Maharashtra ची स्थापना झाली. या अगोदर गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य एकत्र होते आणि राज्यच नाव बॉम्बे स्टेट असे होत.
- महारष्ट्रात एकूण 36 जिले आहेत.
विकास
- महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी देखील आहे.
- महाराष्ट्राची GDP 430 बिलियन डॉलर एवढी आहे. भारतात GDP मध्ये महाराष्ट्रा सर्वात पुढे आहे.
- 2014 15 मध्ये झालेल्या सर्वे नुसार महाराष्ट्रातील दरडोही उत्पन्न १३४००० एवढी होती जी भारतातीच्या दरडोही उत्पन्ना ८८५५३ पेक्षा खूप जास्ती होती.
- कोणत्याही राज्या पेक्षा महारष्ट्रात सर्वात जास्ती लोक टक्स भारतात.
- महाराष्ट्रामध्ये ऐकूण 2,67,500 किमी चा रोड नेटवर्क आहे जो भारतातील कोणत्याही राज्या पेक्षा सर्वात जास्ती रोड नेटवर्क आहे.
मुबई बद्दल थोडक्यात
- महारष्ट्र असा आहे एकमेव राज्य ज्यात मुंबई आणि पुणे हे 2 मेट्रो सिटी येतात.
- वरती सांगितल्या प्रमाणे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी देखील आहे.
- मुंबईमध्ये शेकडो मोठ्या कंपन्या आहेत, जे मुबईला महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आणि जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर बनवतात.
- महाराष्ट्राला हिंदी चित्रपटांचा केंद्र म्हणतात. बहुतेक चित्रपट तारे मुंबई मध्येच राहतात.
- महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठ नयोजन करून वसवलेल शहर आहे.
- आशियातील सगळ्यात पहिली रेल्वे महाराष्ट्र मध्ये धावली होती, ही रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई आणि ठाणे दरम्यान धावली गेली होती.
- मुंबई मध्ये दररोज 75 लाख लोक प्रवास करतात म्हणजे जवळजवळ स्विट्झर्लँड देशाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे लोक रोज प्रवास करतात.
महाराष्ट्राच्या बाकी शहरांबद्दल
- महाराष्ट्रातील नागपूर हे एक असे शहर आहे जी कोणत्याही राज्याची राजधानी नाही तरीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक शाखा येथे आहे. आणि भारतातील संपूर्ण बँकेतील सोने येथेच ठेवलं जात.
- बुलढाणा जिल्यात असलेलं लोणार लेक हे भारतातील एकमेव खाऱ्या पानाचे तलाव आहे. जे 52,000 वर्षा पूर्व पडलेल्या एका उल्का मुळे निर्माण झाले आहे.
- महाराष्ट्रातील नवापुर रेल्वे स्थानक अर्धा गुजरातमध्ये आहे आणि अर्धा महाराष्ट्रात आहे.
- महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वसलेले हे गाव ज्याच नाव ‘शेतफळ’ असे आहे. या गावाला नागांचे गाव असे म्हंटले जाते. कारण इथे प्रत्येक घरात नाग आढळून येतो. प्रत्येक घरात अगदी कुठलीही भीती न बाळगता घरातील एका सदस्याप्रमाणे हे नाग वावरत असतात. असे असले तरी आजपर्यंत कुठलीही हानी अथवा कुणालाही सर्पदंश झाल्याची घटना गावात घडली नाही.
- जगातील सर्वात मोठा कांदा बाजार महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळजवळ प्रत्येक वर्षी जगभरातील अर्ध्या कांद्याचे उत्पादन एकटा नाशिक जिल्हा करतो.
आता काही quick फाक्ट्स
- भारतातील सगळ्यात जास्त किल्ले हे महाराष्ट्रामध्येच आहेत, ज्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांचे आभारी आहोत कारण त्यांनी 300 हून अधिक किल्ले महाराष्ट्रात बांधले होते.
- शिवाजी महाराजांनीच महाराष्ट्रातील पहिल्या नेव्ही पथकाची सुरवात केली होती.
- भारतात सगळ्यात पहिला चित्रपट नाशिक जिल्ह्यातील दादासाहेब फाळके यांनी बनविला होता.
- भारतातील सगळ्यात जास्त पाण्याचे धरण हे महाराष्ट्रा मध्ये आहेत पण दुखद गोष्ट अशी कि बहुतेक धरण हे कोरडे पडलेले आहेत.
- महाराष्ट्रची सीमा भूतान, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, मंगोलिया, पनामा, कुवेत, आयर्लंड, ओमान, फिजी, लक्झेंबर्ग अशा अनेक देशांपेक्षा मोठी आहे.
- भारतातील सर्वात मोठे औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रात आहे, भारतातील एकूण औद्योगिक उत्पादनापैकी 25% एकट्या महाराष्ट्रात होते.
- शिवाजी महाराजांनी जिल्हाधिकारीची प्रथा सुरू केली, नंतर ब्रिटिशांनी ही पद्धत बदलली.
2 टिप्पण्या
Atishya Upyukta Post Very Nice Marathi Info
उत्तर द्याहटवाnice information and news
उत्तर द्याहटवा