टायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.

टायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.

टायटॅनिक बुडाले तेव्हा जवळजवळ तीन जहाजे त्याच्या जवळपास होती.

त्यापैकी एक सॅम्पसन म्हणून ओळखले जात असे. ते टायटॅनिकपासून 7 मैल दूर होते आणि त्यांनी धोका दर्शविणारा पांढऱ्या उजेडाच्या आकाशात उडवलेल्या दारूगोळ्याना पाहिले, परंतु ते जहाज बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते व जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो तर पकडले जावू म्हणून ते मागे वळून टायटॅनिक च्या उलट दिशेने निघून गेले

हे जहाज आपल्यापैकी त्या लोकांच प्रतिनिधित्व करतात जे लोक आपल्या स्वत: च्या पापामध्ये इतके व्यस्त आहेत आणि कोणीतरी गरजवंत आहे त्याला आपली गरज आहे हे ओळखू शकत नाही ...!

दुसरे जहाज कॅलिफोर्निया होते. हे जहाज टायटॅनिकपासून फक्त 14 मैलांवरच होते, पण ते चोहोबाजूंनी हिमनगांनी वेढलेले होते त्यावरिल कप्तानाने बाहेर बघितले आणि संकटात सापडल्याचा इशारा देणाऱ्या पांढऱ्या फ्लेयर्स पाहिल्या, परंतु परिस्थिती अनुकूल नव्हती आणि अंधारलेली होती म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला व झोपी गेला व क्रूंनी स्वत: ला असे समजावण्याचा प्रयत्न केला की काहीही झाले नाही....

हे जहाज आपल्यातील त्या व्यक्तींच प्रतिनिधीत्व करतात जे आता काही करू शकत नाही परिस्थिती योग्य नाहीत आणि त्यामुळे कोणाला मदत करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल होईपर्यंत ते प्रतीक्षा करतात

शेवटचे जहाज होते कार्पाथिया होता. टायटानिकपासून 58 मैल दूर दक्षिणेकडील दिशेने धावणारी हे जहाज... त्यांनी रेडिओवर टायटँनिक वरील हलकल्लोळ, रडणे,मदतीचा आक्रोश ऐकला, या जहाजाचा कप्तानाने गुडघे टेकून, ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि मग पुर्ण वेगाने जहाज चालू केले आणि सभोवतालच्या पसरलेल्या हिमनगातून मार्ग काढत हे जहाज टायटॅनिक जवळ पोहोचले व हेच ते जहाज होते ज्याने टायटॅनिक वरिल 705 जणांना वाचवले.

बोध.... -

अडथळे आणि जबाबदारी टाळण्यासाठी कारणे नेहमी असतील, परंतु जे लोक ते स्वीकारतात ते नेहमी त्यांच्या चांगल्या कृत्याने जगाच्या हृदयात स्थान मिळवतात....! व जग नेहमी त्यांना त्यांच्या चांगुलपणामुळे अंतःकरणात स्थान देते

मला खरोखर इच्छा आहे की आम्ही सर्वांनी कार्पेथियन प्रमाणे जीवनात जगावे... ना की Sampsons आणि Californians प्रमाणे जीवन व्यतीत करावे.

auther :- unknown

कथा कशी वाटली, कॉमेंट करून नक्की कळवा. मराठी मोटिव्हेशन च्या फेसबुक पेज ला लाईक करा. धन्यवाद....

if this article belongs to you or your website then message us at marathimotivation@gmail.com we will give you credit about this article

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या