खास आहे आजचा गुगल डूडल-मुलींनी आवश्य वाचायला हवे

​खास आहे आजचा गुगल डूडल


​आज 3 जानेवारी म्हणजे महान महिला समाज सुधारक, आणि शिक्षण प्रसारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस होय. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह मोठी कामगिरी बजावली. त्यांना श्रद्धांजली म्हणून गूगल इंडिया ने आज खास त्यांचा डूडल ठेवला आहे.

एकोणिसाव्या शतकाच्याच्या मध्यात स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता. भरताच्या रुढीवादी परंपरेत  स्त्रींयांना फक्त "चूल आणि मुल"  या साठीच स्थान होते, या व्यतिरिक्त स्त्रीला समाजात कोणताही दर्जा नव्हता. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरतात हे सगळे सावित्रीबाई फुले यांचा मुळेच. या मुले आजचा दिवस सर्व महिलांसाठी विशेष ठरतो.


सावित्रीबाई यांचा बद्दल काही खास माहिती


सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त त्यंचा बद्दल काही खास माहिती

 1. आज म्हणजे 3 जानेवारी त्यांचा जयंतीनिमित्त बालिका दिवस साजरा केला जातो.

 2. पुणे युनिव्हर्सिटी चे नाव सावित्रीबाई फुले यांचा कामाची आठवण म्हणून त्यांचा नावावर ठेवण्यात आले आहे

 3. सावित्रीबाई फुले यांचा जन्म  3 जानेवारी 1831 मध्ये झाला

 4. 1840 मध्ये ते फक्त 9 वर्षाचे होते तेंव्हा त्याचं लग्न 13 वर्षाचा महात्मा जोतीबा फुले यांचा सोबत झाला.

 5.  सावित्रीबाई फुले हे देशातील पहिली शिक्षिका होय आणि नारी मुक्ती आंदोलनाची पहिली नेता होय.

 6. त्यांनी आणि जोतीबा फुले दोघांनी मिळून पुणे मध्ये जवळपास 18 महिलांसाठी शाळा उघडल्या.

 7. सावित्रीबाई नी 28 जानेवारी 1853 मध्ये गर्भवती बलात्कार पीडितांच्या साठी बाल हत्या प्रतिबंधक ग्रह ची स्तापना केली.

 8. त्यांनी 19 शतकातील शिवा-शिव, सतीप्रथा, बाल विवाह आणि विधवा विवाह बंदी सारख्या कुरीती विरुद्ध आपल्या पती सोबत लढल्या.

 9. सावित्रीबाईनी आत्महत्या करायला जाणाऱ्या, एका ब्राम्हण महिला काशीबाई हिला वाचवल होत. एवढच नाही तर तीची स्वतः च्या घरात बाळंतपण करून तिचा मुलाला दत्तक ही घेतल. त्या मुलाच नाव यशवंत ठेवले आणि त्याच चांगल पालन पोषण करून त्याला मोठ डॉक्टर बनवल.

 10. महत्मा जोतीबा फुले यांचा मृत्यू हा 1890 मध्ये झाली तेंव्हा त्यांचा अपूर्ण कामाला पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी केला.

 11. पुढे सातवर्षानी 1897 मध्ये सावित्रीबाई फुले याचं निधन प्लेग च्या रुग्णाची सेवा करताना झाला.

कसा वाटला आजचा लेख जरूर कळवा कॉमेंट करा. आता कॉमेंट करण्यासाठी फक्त नाव टाकून कॉमेंट लिहा. आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा धन्यवाद.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या