नोबेल पारितोषकाचे जनक - आल्फ्रेड नोबेल यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग

आपली कशी ओळख मागे राहावी असं तुम्हाला वाटतं.

​सुमारे शंभर वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका माणसाने सकाळचं वृत्तपत्र पाहिलं. आपल्या स्वतःवरचाच मृत्यूलेख पाहून त्याला धक्काच बसला. नाम साधर्म्यामुळे गफलत होऊन त्याचा मृत्यूची बातमी चुकून प्रसिद्ध झाली होती. त्याची पहिली प्रतिक्रिया म्हणजे धक्का होता. आपण खरंच मरण तर पावलो नाही ना, असंही त्याला क्षणभर वाटून गेलं.

या धक्क्यातून सावरल्यावर तो पुढे वाचू लागला. मृत्यूलेखात म्हटलं होतं: विध्वंसक स्फोटकांचा जनक मरण पावला. 'इमारती, रस्ते, पूल उद्ध्वस्त करणाऱ्या डायनामाईत या विध्वंसक स्फोटकाचा निर्माता', 'जगभरातील अशांततेचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनाने गबर पैशाचा बनलेला धनी' अशी विशेषणे आपल्याला लावलेली त्याने वाचली. त्याने स्वतःला प्रश्न विचारला, "हीच का माझामागे माझी ओळख उरणार आहे?" भानावर येऊन त्याने आपली चांगली ओळख मागे राहण्यासाठी काहीतरी करायचे ठरवलं.

त्याने जगामध्ये शांततेसाठी काम करायला सुरुवात केली. त्याचं नाव होतं आल्फ्रेड नोबेल. नोबेल पारितोषिकाचा जनक म्हणून आज आपण त्याला ओळखतो.आल्फ्रेड नोबेल ने ज्याप्रमाणे आपल्या अंतरीच्या खऱ्या आवाजाला साद दिली आणि स्वतःच्या मूल्यांचा पुनर्विचार केला त्याप्रमाणे आपणही थोडं अंतर्मुख होऊन आपली मूल्य तपासून पहायला पाहिजेत.

तुम्ही जगाला कोणता वारसा देणार आहात? कश्या प्रकारची व्यक्ती म्हणून तुमची आठवण कायम राहावी असं तुम्हाला वाटतं? तुमच्याबद्दल लोक चांगलं बोलतील का? लोक तुमची प्रेमाने आणि आदराने आठवण काढतील का? तुमची उणीव लोंकाना भासत राहील का? या सर्व बाबींचा विचार करूनच आपले ध्येय ठरवा.

कसा वाटला आजचा लेख आवडले असेल तर आमचे फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा. तुम्हाला तिकडे या पेक्षा जास्ती चांगले लेख वाचायला मिळतील… धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या