ISRO बद्दल काही रोचक माहिती | Interesting facts about ISRO

Indian Space Research Organization (ISRO)

मित्रानो आज आपण भारताचे गौरव ISRO बद्दल वाचणार आहोत. थोडक्यात एका शब्दात इसरो बद्दल सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये जसे नासा ही अंतराळ संस्था आहे तशीच भारतात इसरो ही अंतराळ संस्था आहे. इसरो ने आपल्या दमदार कामगिरी ने जगात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

नुकतेच ISRO ने 104 सॅटलाईट अंतराळात सोडून अभूतपूर्व इतिहास रचले. या अगोदर हा रेकॉर्ड फक्त 37 सॅटलाईट सोडण्याचा होता. चला तर बघू या ISRO संस्थे बद्दल आणखी काही रोचक माहिती. ही माहीती वाचून तुम्हाला गर्वची अनुभुती झाल्या शिवाय राहणार नाही.

ISRO ची स्थापना


इसरो ची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये भारताचे सुप्रसिध्द शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांनी केली. Indian Space Research Organization याचे लघु रूप म्हणजेच ISRO होय. याला मराठी मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था असे म्हणता येईल. इसरो अगोदर भारताच्या अणू संशोधन विभागाच्या अखत्यारीत येत असे. पण त्याला 1969 मध्ये स्वतंत्र विभाग बनवले गेले.

क्रायोजनीक इंजीन


लांब टप्प्या च्या मिसाईल लॉन्च साठी आवश्यक असलेली टेक्नॉलॉजी म्हणजे क्रायोजनीक इंजीन होय. ही एक खूप चांगली पण तेवढीच जटील तंत्रज्ञान असते. हे तंत्रज्ञान फक्त 5 देशांकडेच उपलब्ध होत. ज्यात रशिया, अमेरिका, चायना, फ्रांस आणि जपान हे देश येतात. हे तंत्रज्ञान असलेले देश हे एलिट स्पेस क्लब (elite space club) चे मेंबर म्हणून ओळखले जातात. सध्या यात भारत देखील शामिल आहे.

भारताने यातल्या काही देशांकडे क्रायोजनीक इंजीन चे तंत्रज्ञान मिळवण्या बाबत चौकशी केली होती. काही देश तर तंत्रज्ञान देण्यासाठी तयार हि झाले होते पण अमेरिकेने सर्व देशांवर दबाव आणून भारताला हे तंत्रज्ञान मिळू दिले नाही. नंतर जेंव्हा मंगळ ग्रहावर जाण्यसाठी भारताने अमेरिकेला मदत मागितली होती त्या वेळी देखील भारताला स्पष्ट नकारच मिळाला. या वर अमेरिकेतील नुयॉर्क टाइम्स (new York times ( NYT)) या वृत्तपत्रात भारताची कार्टून द्वारे खिल्ली देखील उडवली गेली होती.


न्यूयॉर्क टाईम्स मध्ये छापले गेलेले कार्टूनभारतीय शास्त्रज्ञ या घटने पासून खचून न जाता, क्रोयजनीक इंजीन स्वतः बनवण्याच्या उद्देशाने तयार झाले. इसरोने आता स्वदेशी इंजीन बनवायला सुरुवात केली होती. 2010 मध्ये बनवलेल्या स्वदेशी इंजीन ची टेस्टिंग घेण्यात आली पण ते इंजीन हवेतच स्फोट होऊन कोसळले. खूप मोठं अपयश इसरो ला आले होते. पण याला खच्चून न जाता भारताने इतर देशांपेक्षा शक्तीशाली आणि जास्ती वजन घेऊन जाणारा क्रायोजनीक इंजीन ची निर्मिती केली होती.


नुकतेच भारताने आपल्या शक्तीशाली क्रायोजनीक इंजीन च्या मदतीने 104 सॅटेलाईट अंतराळात सोडले. हा एक खूप मोठा रेकॉर्ड आहे. या अगोदर हा रेकॉर्ड रुस च्या नवे होता, ज्यांनी फक्त 37 सॅटेलाईट एका वेळी सोडले होते. पुढील काळात या रेकॉर्ड ला तोडणे दूर याचा जवळ देखील कोण येणार नाही. यात विशेष एक बाब सांगावी वाटते ती म्हणजे 104 सॅटेलाईट मध्ये 96 हे जागतिक महासत्ता म्हणवणऱ्या अमेरिकेची होती. या वरून नुयॉर्क टाइम्स चा खरपूस समाचार घेत आपल्या टाइम्स ऑफ इंडिया ने देखील एक कार्टून प्रसिद्ध केलं होत, ते असे.


NYT ला टाईम्स of इंडिया चे उत्तर

मंगळायन मिशन


भारत असा एकमेव देश आहे जो मंगळावर पहिल्याच प्रयत्नात पोचला. बाकी अमेरिकेने तिकडे पोचण्यासाठी 5 वेळा प्रयत्न केलं होतं त्यांना 6 व्या वेळी यश आले. तेच सोव्हिएत संघ ज्याला रुस असे देखील म्हंटले जाते त्यांनी देखील 8 वेळा प्रयत्न केलं होतं. रुस ची स्पेस एजन्सी हि नासा पेक्षा प्रगत आहे असे बोलले जाते तरी ही गत. चीन ला देखील पहिल्या प्रयत्नात यश आले नव्हते.

मंगळ यान

मंगळयान मिशन ची आणखी एक विशिष्ट म्हणजे याचा खर्च. हॉलिवूड मध्ये ग्रॅविटी नावाचा एक चित्रपट ला होता. जो अंतराळावर आधारित असू ज्याला जवळपास 700 करोड एवढा खर्च आला होता. पण आपल्या मंगळायन मिशन साठी फक्त 430 करोड एवढा खर्च आला होता. आणखी एक गंमत म्हणजे, जर आपण यानाने कापलेलं अंतराचा विचार केला तर यानाला एक किमी साठी फक्त 7 रुपये खर्च आला, जो ऑटोरिक्षा च्या भाड्या पेक्षा कमी होत.

2000 च्या नोटवर इसरो चे मंगळयान

मंगळायन हे भारताचे आज पर्यंत चे सर्वात स्वस्त आणि यशस्वी मिशन आहे या मुळेच आज आपल्या 2000 रु च्या मागे इस्रो च्या मंगळायन चा फोटो छापला गेला आहे. कोण्या संस्थे साठी या पेक्षा गौरवाची दुसरी कोणती बाब असू शकते.

इसरो बद्दल आणखी काही रोचक माहिती.


  1. इसरो ने आपल्या पहिल्याच मिशन जो चंद्रयान होत. त्या साठी फक्त 390 करोड रुपये खर्च केले होते. ही रक्कम जर नासा सोबत तुलना केली तर नासा ला अश्या मिशन साठी इसरो पेक्षा 8 ते 9 पटीने जास्ती पैसे लागतात.

  2. एस एल वी 3 हे पहिले स्वदेशी सॅटेलाईट लॉन्च व्हीकल होत. ज्याच्या परियोजना चे निर्देशक डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे होते.

  3. मागील 40 वर्षात इसरो वर भारताने जेवढं खर्च केलं आहे तेवढं नासाचे एका वर्षाचे बजट असते.

  4. इसरो ने 1981 साली ऍप्पल नावाचे यान लॉन्च केलं होतं. त्याचे लॉन्चिंगी पॅड हे बैल गाडी मधून आणले गेले होते.

  5. जगात फक्त 6 अंतरिक्ष एजन्सी कडेच जमिनी वरून अंतरिक्षात सॅटेलाईट सोडण्याची क्षमता आहे. त्यात भारत देखील येतं.

  6. जगातील इतर कोणत्याही संस्थे पेक्षा इसरो मध्ये जास्ती अविवाहित काम करतात.

  7. इसरो अंतराळात मानवाला पाठवण्याचा तयारीत आहे. त्यासाठी एक असा यान तयार करण्यात येत आहे. ज्यात अंतरिक्ष यात्रींना 7 दिवसा पर्यंत पृथ्वी च्या कक्षेत ठेवलं जाऊ शकते.

इसरो बद्दल खूप काही आहे आणखी सांगण्या सारखे. जे एका लेखात सांगणे कठीण आहे. म्हणून भविष्यात इसरो बद्दलच्या खास लेखात त्या वर चर्चा करू.

कसा वाटला आजचा लेख आवडले असेल तर कॉमेंट करून काळवा. आमचे फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा.  तिकडे तुम्हाला खुपकाही नवीन वाचायला मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या