कथा आदित्य बिर्ला यांच्या एका चांगल्या सवयीची

आदित्य बिर्लाआदित्य बिर्ला हिंदाल्कोचे प्रमुख असतांना त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीच्या निर्णयामुळे कंपनीला सुमारे ५ करोडचे नुकसान झाले. अनेक सहकार्याना वाटले की आता आदित्य बिर्ला त्या माणसाला खूप ओरडतील आणि शेवटी कामावरून काढून टाकतील.

पण तसे झाले नाही. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावण्या आधी आदित्य बिर्ला यांनी एक नोट पॅड घेतले. आणि त्यावर मथळा लिहिला "या माणसाचे प्लस पॉईंट" नंतर त्यांनी त्याखाली त्याचे सर्व चांगले मुद्दे लिहिले. त्यात त्या माणसाने पूर्वी कंपनीला अडचणीच्या काळात केलेली मदत, की ज्यामुळे कंपनीला करोडो रुपये फायदा झाला होता, असे पण मुद्दे लिहिले.

आदित्य बिर्ला यांच्या एका जवळच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचा हा गुण पाहिला होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्या या गुणामुळे मी पण प्रभावित झालो आणि स्वतः पण तेच अंगिकारले. जेंव्हा जेंव्हा मला एखाद्या सहकार्याचा राग येतो तेंव्हा तेंव्हा मी कागद घेऊन त्या माणसाने आजपर्यंत कंपनीसाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची यादी लिहून काढतो. मग राग आपोआपच नियंत्रणात येतो.

अशाप्रकारे मी किती वेळा घाईगडबडीत निर्णय न घेता सारासार विचार करून माझ्या मनाला टोकाचा निर्णय घेण्यापासून वाचवले आहे.

ज्यांचा कामात माणसांशी संबंध येतो अशा सर्वांना मी अशी विनंती करतो की अशी वेळ आल्यावर तुम्ही कुठलाही टोकाचा निर्णय घ्यायच्या आधी, थांबा, एका जागी शांत बसा, पॅड घ्या, त्याव्यक्तीने आजवर केलेल्या चांगल्या कार्याची यादी बनवा, म्हणजे आपोआपच तुम्ही असा कोणताही निर्णय घेणार नाही, की ज्या मुळे तुम्हाला त्या निर्णया बद्दल पाश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.

मग मित्रांनो कसा वाटला हा लेख जरूर कळवा. अशेच काही खाली दिलेले लेख तुम्हाला नक्की आवडतील .अश्या सुंदर लोकांचे सुंदर लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या