महाराज जयसिंहजी या भारतीय राजाने रोल्स रॉयल्स कार कचरा गोळा करण्यासाठीवापरली.


महाराज जयसिंहजी या भारतीय राजाने रोल्स रॉयल्स कार कचरा गोळा करण्यासाठी वापरली.

इंग्लडची राजधानी लंडन मध्ये एकदा महाराज जयसिंहजी साधे कपडे घालून बाॅन्ड स्ट्रीट वर फिरायला गेले. फिरत असतांना त्यांना रस्त्यात रोल्स राॅयस या अलिशान व सर्वाधिक महागड्या गाडीचे शोरूम दिसले.

महाराज जयसिंहजी गाडीची चौकशी करण्यासाठी आत गेले असता तेथील इंग्रज मॅनेजर व सेल्समनने कंगाल भारतीय म्हणून हिणवले व अपमानास्पद वागणूक देऊन शोरूमच्या बाहेर हाकलून दिले.

अपमानित झालेले राजे वापस आपल्या हाॅटेलमध्ये गेले व त्याच शोरूमला फोनवरून निरोप पाठवला की, अलवारचे महाराजा जयसिंहजी काही गाड्या खरेदीसाठी येत आहेत. काही वेळातच महाराज जयसिंहजी आपल्या राजेशाही पोशाखात व लवाजमा घेऊन त्या शोरूम मध्ये पोहचले असता त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती ज्या मॅनेजरने व सेल्समनने महाराजांना अपमानित करून हाकलून दिले होते. तेच त्यांच्या समोर मान झुकून उभे होते.

त्यावेळी महाराजांनी त्या शोरूम मध्ये असलेल्या सर्वच्या सर्व सहा कार विकत घेऊन भारतात पाठवायल्या सांगितल्या व भारतात आल्यावर महाराजा जयसिंह यांनी त्या सहाची सहा महागड्या गाड्या अलवार नगर पालिकेला देऊन शहरातील कचरा गोळा करण्यासाठी वापर करण्याचा आदेश दिला.

जगातील सर्वात नामांकित व महागडी कार रोल्स राॅयस अलवार शहरात कचरागाडी म्हणून वापरात येते ही बातमी वा-यासारखी जगभरात पोहचली आणि रोल्स राॅयस कंपनीची बदनामी झाली.

युरोप, अमेरिकेतील एखादी गर्भ श्रीमंत व्यक्ती म्हणाली की, माझ्याकडे रोल्स राॅयस कार आहे तर समोरची व्यक्ती म्हणायची की, कोणती? ती का जी भारतात कचरागाडी उचलण्यासाठी वापरतात या बदनामी मुळे कारची विक्री कमी झाली

परिणामी कंपनी डबघाईला आली.

अखेर कंपनीच्या मालकाने महाराज जयसिंह यांना माफीनामा पाठवून कचरागाडी म्हणुन वापरू नये अशी विनंती केली व त्या मोबदल्यात आणखी सहा गाड्या मोफत देण्याचे आश्वासन दिले

अश्या प्रकारे महाराज जयसिंह यांनी इंग्रज उद्योगपतीला चांगलाच धडा शिकवला.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या