बिटकॉईन
बिटकॉईन बद्दल तुम्ही ऐकले असेल. आणि खूप सारे प्रश्न देखील या बिटकॉइन बद्दल तुम्हला पडले असतील तर हा लेख तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल.बिटकॉईन म्हणचे काय? आणि त्याचा इतिहास.
बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. जसे सध्या तुमच्या कडे 100₹, 500₹ चे चलन आहे ना अगदी तसे पण बिटकॉइन अश्या चालनापेक्षा थोडा वेगळा आहे. त्याला तुम्ही ना पाहू शकता ना त्याला स्पर्श करू शकता. बिट-कॉईन म्हणजे कॉम्प्युटर मधील काही विशिष्ट असे code असतात. आणि ते ज्यात ठेवलं जातं त्याला वॉलेट असे म्हणतात. हे वॉलेट ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारात असतात. याबद्दल
आभासी असले तरी देखील आज हे अस्तित्वात असेल सर्वात महागडे चलन आहे. आज एक बिटकॉइन ची किंमत जवळपास भारतात 12 लाख रुपये आहे. आणि डॉलर मध्ये 14,000 $ एवढी आहे. आणि काही दिवसा खाली याची किंमत 20,000 डॉलर पर्यंत गेली होती.
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, जर इंटरनेट नावाचा देश असता तर बिट कॉईन त्या देशाची राष्ट्रीय चलन असते.
बिटकॉईन चा इतिहास
हे आभासी चलन Satoshi Nakamoto (सतोशी नाकामोटो) नावाचा एक जपानी संगणक तज्ञाने 2009 मध्ये बनवले. हा माणूस कोण होता आणि सध्या तो कुठे आहे. हे एक मोठं रहस्यच आहे. कारण वेळोवेळी सतोशी नाकामोटो असल्याचा दावा करणारे लोक समोर आले पण सर्वांचा दावा फोल ठरला.सतोशी नाकामोटोने बिटकॉइन हे चलन म्हणून बनवलेलं नव्हतंच मुळात, त्याला एवढेच दाखवायचे होते की दोन व्यक्तींमध्ये कोण्या तिसऱ्या संस्थेच्या जसे बँक इत्यादी च्या हस्तक्षेपा शिवाय ऑनलाईन पैश्याची देवाण घेवाण होऊ शकते. पण काही लोकाना जे सध्याच्या चलनावर पर्याय शोधात होते अश्या लोकांना बिटकॉईन मागचे तंत्रज्ञान आणि संकल्पना खूप आवडली. आणि ते बिटकॉइन चलन म्हणून उपयोगात यावा या साठी प्रयत्न करू लागले.
बिटकॉईन ने केलेला पहिला व्यवहार.
बिटकॉईन चे देवाण घेवाण तर होत असे पण ते फक्त बिटकॉईनला ओळखणाऱ्या आणि चाहत्यांमध्येच. खऱ्या अर्थाने बिटकॉईन चा पहिला व्यवहार हा "लासजलो हाण्याइसिझ (Laszlo Hanyecz)" नावाच्या प्रोग्रामर ने केला. त्याने तब्बल 10,000 बिटकॉईन देऊन दोन पापा जॉन पिझ्झा खरेदी केले होते. त्या वेळी बिटकॉईन चलन हे खूपच नवीन होते.10,000 बिटकॉईन ची तसे काही किंमत नव्हती त्यात 25$ चे 2 पिझ्झा मिळवून लासजलो खुशच असणार. पण सध्या जगात 70,000 पेक्षा जास्ती विक्रेते बिटकॉईन स्विकारतात. व एक बिटकॉईन 10 लाख रुपयाचा येतो, आता ती रक्कम जवळपास 10 अब्ज रुपय इतका होतो. आजपर्यंत च्या इतिहासात एवढा महाग पिझ्झा कोणी खाले नसेल.बिटकॉईन किंमती मागचे गूढ
बिटकॉईन ज्या वेळी वापरात आला तेंव्हा तो जवळपास 5 ते 10 cent किंमतीचा होता म्हणजे 3 ते 6 रुपये. पण आज 10 वर्षा नी त्याची किंमत 10 लाख म्हणजेच 1 लाख पटीने तो वाढला आहे. कोणाला पण साहजिक हे पटण्यासारखे व पचण्यासारखं अजिबात नाहीये. पण ही वाढीमागे एक कारण आहे.अगोदर नोटा छापण्यासाठी त्या मागे तेवढे सोने ठेवले जायचे. पण सध्याचे चलन हे फियाट करन्सी आहे. म्हणजे त्याचा मागे सोने वगैरे काही ठेवलेलं नाहीये. कोणतेही सरकार अर्थसंकल्पात काही विकास कामांची घोषणा करते. ते विकास काम सरकार ला येणाऱ्या महसुलातून जसे टॅक्स इस्त्यादीं च्या पैसामधून करायचे असते. पण विजय मल्ल्या सारख्या कर्ज बुडवू लोकांमुळें आवश्यक तेवढा महसूल मिळत नाही. परिणाम विकास कामा साठी सरकार ला जास्ती चलन बाजारात आणावे लागते, परिणामी महागाईत वाढ होते. या फियाट करन्सी चा सर्वात मोठा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे याला सरकार हवे तेवढे छापू शकते.
हाच निगेटिव्ह पॉईंट नेमका बिटकॉईन मध्ये नाहीये. सतोषी नाकामोटो यांनी बिटकॉईन निर्माण करताना त्याची संख्या निर्धारित राहील आणि त्याला लोकांना वाटेल तेवढे निर्माण करता येऊ नये म्हणून Cryptography या तंत्रज्ञानाचा उपयोग केला. यामुळे बिटकॉईन ला ऑनलाईन आणि offline store करता येतो. आणि त्याला निर्धरीत संखे पेक्षा जास्ती निर्माण केलं जाऊ शकत नाही.
मागणी आणि पुरवठा याचे सुत्र
2 कोटी 10 लाख एवढी बिटकॉईन ची संख्या निर्धारित आहे. त्या पेक्षा जास्ती बिटकॉईन तयार केले जाऊ शकत नाही. सध्या 16,781,400 एवढे बिटकॉईन मार्केट मध्ये आहेत. राहिलेले दर वर्षी काही ठराविक बिटकॉईन बाजारात येतात. आणि प्रत्येक वर्षी अगोदरच्या वर्षा पेक्षा अर्धे बिटकॉईन येतात. हे बिटकॉईन माइनिंग नावाच्या एका जटील प्रक्रियेतून येतात.
बिट-कॉईन घेण्यासाठी लोक वाढत आहेत पण बिट-कॉईन मर्यादित आहेत म्हणून बिटकॉईन ची किंमत 10 एवढी भयंकर वाढली आहे. बिटकॉईन ची किंमत कोणती संथा किंवा व्यक्ती ठरवत नसून बिटकॉईन खरेदी विक्री करणारे लोक ठरवतात. मागणी आणि पुरवठा या सुत्रा नुसार बिटकॉईन ची किंमत वाढणार हे निश्चित होते पण एवढ्या कमी वेळेत त्याची किंमत वाढेल हे कोणाला वाटले नव्हते. मागच्या २०१७ जानेवारी मध्ये एक बिटकॉईन ६० ते ७० हजारांचा येत असे, एका वर्षात तो १५ पट वाढून १० लाखांवर गेला.
बिटकॉइन बद्दल सध्या जगात दोन मत प्रवाह आहेत. काही लोक याला आर्थिक क्रांती समजत आहेत तर काही लोक याला एक फुगा (bubble) समजत आहेत, जो कधीही फुटेल आणि लोकांचे पैसे बुडतील. पण बिटकॉइन क्रांती कि फुगा वेळच सांगेल. जर बिटकॉइन क्रांती ठरली तर त्यात आज गुंतवणूक केलेल्याना खूप मोठा फायदा होणार हे निश्चित. पण याला तुम्ही गुंतवणुकीचा सल्ला अजिबात समजू नका. आणि क्रिप्टो करन्सी मध्ये तेवढीच गुंतवणूक करा जेवढी तुमची पैसे गमवण्याची तयारी आहे.
पुढच्या भागात बिट-कॉईन भविष्याचे चलन होऊ शकतो का या वर प्रकाश टाकू शिवाय त्यातल्या काही तांत्रिक बाबींची माहिती घेऊ. हा लेख कसा वाटला जरूर कळवा. बिट-कॉईन बद्दल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून सांगा.
0 टिप्पण्या