Happy Birthday फेसबुक - आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण

Happy Birthday फेसबुक

मार्क झुकरबर्गने फेसबुक ची स्थापना केली. यावर इतके युजर्स आहेत की, फेसबुक कोणता देश असता तर त्याची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असती.

फेसबुकने साऱ्या जगभर आपलं जाळं पसरलं आहे. आपल्या खास फिचर्सने साऱ्यानांच मोहिनी घालणाऱ्या या फेसबुकने जेव्हा सुरवात केली तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की, फेसबुकची भरारी एवढी मोठी असेल ते. इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १२० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १२० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे.

गेल्या काही वर्षात या सोशल नेटवर्किंग साइटने जी लोकप्रियता मिळवली, तशी लोकप्रियता दुस-या कोणत्याही नेटवर्किंग साइटला मिळालेली नाही. सध्या फेसबुकला ट्विटर आणि तशाच प्रकारच्या इतर नेटवर्किंग साइट्सकडून स्पर्धा निर्माण झाली असली आणि फेसबुकच्या आधीही तशा प्रकारच्या वेबसाइट्स निर्माण झाल्या असल्या तरीही सोशल नेटवर्किंग ही संकल्पना लोकांमध्ये इतक्या जास्त प्रमाणात रुजवणारी फेसबुक ही पहिली वेबसाइट आहे आणि या वेबसाइटची वाटचाल थक्क करणारी आहे.४ फेब्रूवारी २००४ मध्ये जेव्हा फेसबुक लॉन्च झाले, तेव्हा ते केवळ हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी हे एक सॉफ्टवेअर होते. मार्क झुकरबर्ग आमि त्यांचे मित्र सेवेरिन, मॅककॉलन, मोस्कोविट्ज आणि क्रिस ह्यूगस हे जग जिंकण्याच्या उद्देशाने काम करत नव्हते. त्यांना केवळ एक सॉफ्टवेअर बनवायचे होते. एक असे सॉफ्टवेअर ज्याची मेंबरशिप लिमिटेड असेल आणि विशेष म्हणजे हे सॉफ्टवेअर केवळ हॉवर्डच्या विद्यार्थ्यांसाठीच असेल. मात्र ती चालवण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. आर्थिक समस्येपुढे मार्क यांनी हार नाही मानली. पैशांची कमतरता होती, तेव्हा १०० परिवाराकडून ८५,००० डॉलर कर्ज म्हणून घेतले. त्यांनतर वेबसाइट चालत राहिली. पीटर थील यांनी एफबीमध्ये ५ लाख डॉलर गुंतवले. त्यानंतर मार्क यांची वेबसाइट वेगाने आकार घेत राहिली.

फेसबुकची लोकप्रियता तरुणांमध्ये विशेषत: किशोरवयीन मुलामुलींमध्ये अधिक असल्याचे म्हटले जाते. ज्यांच्या आवडीनिवडी सातत्याने बदलत असतात, जे कधीही एका विशिष्ट गोष्टीला चिकटून राहत नाहीत, असा हा वर्ग असल्याचे समजले जाते. त्यामुळेच हा वर्ग या वेबसाइटला कंटाळू लागला आहे किंवा ते लवकरच कंटाळतील अशा अफवा उठू लागल्या. या अफवांचा फेसबुकच्या बाजारातील शेअरवरही परिणाम झाला. २०१४ यावर्षी ३१ डिसेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये फेसबुकने तब्बल २.५९ अब्ज डॉलर (सुमारे १६ हजार कोटी रुपये) उत्पन्न मिळवले. आधीच्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न ६३ टक्क्यांनी जास्त होते. पण आपल्या व्यापक जागतिक विस्तारावर स्वार होत फेसबुकचे उत्पन्न सातत्याने वाढतच असून सिलिकॉन व्हॅली स्थित फेसबुक सोशल मीडियाने २०१५मध्ये ३ अब्ज ६९ कोटींचे निव्वळ उत्पन्न कमावले आहे.

२०१० मध्ये टाइम मॅगझिनने त्यांना पर्सन ऑफ द इयर घोषित केले. त्यांनी इन्स्टाग्राम व व्हाट्सअपसारख्या कंपनीचे अधिग्रहण केले. झुकरबर्कने २०१३ मध्ये एक बिलियन डॉलर्स चॅरिटीला दान केलं होते. मार्क हा आतापर्यंतचा सर्वाधिक दान करणारा अमेरिकन सेलिब्रिटी आहे. अनावश्यक कामावर त्यांना वेळ वाया घालवायचा नाही. त्यासाठीच ते अनेक आयोजित कार्यक्रमात सामान्य ग्रे टी शर्ट किंवा हुड व जीन्समध्ये दिसून येतात. फेसबुकचा लोगो निळ्या रंगाचा आहे कारण मार्कला लाल-हिरव्या रंगाचा रंगांधळेपणा आहे."प्रश्न हा नाही की आपण लोकांच्या बाबत काय जाणू इच्छितो, प्रश्न हा आहे की लोक आपल्याबद्दल काय सांगू इच्छितात." --- मार्क झुकरबर्ग.

साभार :- https://vinod-gore.blogspot.in/

अश्या मस्त लेखांसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा.

follow our telegram channel
https://t.me/marathimotivation

Join telegram Group:
https://t.me/marathimotivation1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या