IPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये


नुकतेच आयपीएल च्या 11 व्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. नेहमी प्रमाणेच ipl च्या लिलावाने बराच लहान लहान शहरातील गरीब खेळाडूंना करोडपती बनवले, तर बऱ्याच दिग्गज खेळाडूंना कोणी खरेदीदार मिळालाच नाही.

या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला तो म्हणजे इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक, त्याला दिल्ली डेरडेव्हिल या संघाने तब्बल 12.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. तर भारतीय खेळाडूंमध्ये जयदेव उनात्कट ला सर्वात जास्ती 11.5 कोटीची बोली लागली.

पण या सर्व गोंधळात ऐका नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते नाव होतं आर्यमान विक्रम बिर्ला. जो IPL च्या आधारभूत किंमत 20 लाख रुपये मध्ये लिलावात उपलब्ध होता. पण लिलावाच्या पहिल्या फेरीत त्याला कोणी खरेदी केलं नाही. पण दुसऱ्या फेरीत जो शिल्लक राहिलेल्या खेळाडूंसाठी राखीव असतो त्यात त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने 30 लाख रुपयात खरेदी केले.

हा खेळाडू जो फक्त 30 लखात विकला गेला. त्याचे वडील दुसरे तिसरे कोणी नसून कुमार मंगलंम बिर्ला हे होय. जे भारतातील सर्वात मोठे उदोजकांपैकी एक. ज्यांची 800 अरब रुपयांची कुल संपत्ती आहे.



खरे तर आर्यमान ला त्याचा वडिलांचा पाऊल वर पाऊल ठेवून एक ऐशो आरामाची जिंदगी जगता आली असती. पण त्याने क्रिकेटच्या मैदानात मेहनत करून, घाम गाळून स्वतःचे वेगळे अस्तित्त्व निर्माण करायचे ठवरले आहे. त्याने त्याचे आलिशान गाड्या सोडून गर्दीच्या रेल्वे प्रवास स्वीकारला व आपल्या मुंबई मधल्या आलिशान घर सोडून मध्य प्रदेश मध्ये आपल्या क्रिकेट चा छंद जोपासण्यासाठी राहायला लागला.



त्याने मागे सी. के. नायडू ट्रॉफी मध्ये 153 धावांची धुवाधार खेळ करून सर्वांच लक्ष वेधून घेतल होत. म्हणून यावेळी त्याची वर्णी IPL ला लागली आहे. आर्यमान नक्कीच आजच्या पिढीला आदर्श आहे ज्याच्या वडिलांची अरबोची संपत्ती असताना देखील स्वतःचा अस्तित्वासाठी लढतो आहे.

अश्या अनेक लेखांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज.

Join our telegram channel

https://t.me/marathimotivation

For telegram Group:

https://t.me/marathimotivation1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या