टीम ( TEAM ) म्हणजे नक्की काय ?



एकदा एक श्रीमंत उद्योगपती एका खेडेगावात कारखान्यासाठी साईट बघायला गेला होता.

रस्ता कच्चा, खडबडीत होता. काही ठिकाणी रस्त्यात पाणी पण साठले होते, खुप चिखल झाला होता. येताना त्या उद्योगपतीची गाडी चिखलात रुतली आणि बंद पडली. कोणाची मदत मिळते का हे बघायला तो गाडितून खाली उतरला. त्याला थोड्या अंतरावरू एक म्हातारे शेतकरीबाबा येताना दिसले. त्याने त्या शेतकरीबाबांना थांबले, गाडी चिखलात रुतल्याचे सांगीतले व मदत करण्याची विनंती केली.

शेतकरी बाबा गाडीजवळ आले, पहाणी केली आणि म्हणाले, ‘ नामदेवला, म्हणजे नाम्याला बोलवायला लागेल....!

’‘मग बोलवाना तुमच्या त्या नाम्याला! मी त्याला चांगले बक्षीस देईन! मस्त जेवायला, खायला घालेन ...!’ तो उद्योगपती म्हणाला....!

आहो नाम्या म्हणजे कोणी माणुस नाही. तो येक बैल आहे. मी आत्ता त्याला घेऊन येतो!’ ते शेतकरी म्हातारबाबा म्हणाले व लगेचच ‘नाम्याला’ म्हणजे त्या बैलाला घेऊन आले.

त्या बैलाला दोरीच्या सहाय्याने गाडीला जुंपले आणि म्हणाले. ‘हे हरबा खेच! हे ढवळ्या खेच! हे नाम्या खेच! हे पवळ्या खेच!’

त्याबरोबर त्या बैलाने जोर लाऊन ती गाडी चिखलातून खेचून बाहेर काढली. हे बधून तो उद्योगपती खुष झाला पण त्याला समजेना की गाडीला एकच बैल जुंपलेला असताना त्या म्हातारबाबांनी चार बैलांची नावे का घेतली ...

उद्योगपतीने त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हातारबुवा उत्तरले .

‘त्याचे काय आहे! आमचा नाम्या आहे म्हातारा आणि आंधळा. त्याला दिसत नाही. त्यामुळे त्याला एकट्यालाच गाडीला जुंपले आहे हे त्याला माहीत नाही. मी अजून तीन बैलांची नावे घेतली कारण नाम्याला वाटावे की त्याच्याबरोबर अजून तीन बैल आहेत. म्हणजे तो टिममध्ये काम करतो आहे. म्हणूनच तो त्याची ताकद पणाला लाऊन सर्वोत्तम काम करून दाखवतो. साहेब तुमच्या भाषेत याला ‘टीम स्पिरीट’ म्हणतात नाही का?’

एका पागोटे, मुंडासेवाल्या म्हातार्‍या शेतकरीबुवांचे हे बोलणे ऐकून तो उद्योगपती चाटच पडला ...

या कथेतील मतितार्थ ....

  • कोणतेही काम हे टिम/संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टिम मधिल सर्व घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जर जीव ओतून व जोर लावून काम केल्यास ते कार्य अव्दितीय व चोक झाल्याशिवाय राहत नाही ...

  • आपल्या बरोबर कोणी असू नाही तर नसू आपल्यावर असणारी जबाबदारी आपण अगदी चोखपणे करु शकतो हा विश्वासच आपल्याला मनोबल देवून कार्य करुन घेण्यास सहाय्य करत असतो ...

  • आपण स्वत: म्हणजेच एक टिम आहे असे समजून व प्रत्येक सहकार्‍या बरोबर स्वत: पुढे होऊन कार्य केल्यास बरोबर असणारांचाही आत्मविश्वास वाढत असतो ...

  • टिम किंवा संघटनात्मक काम करत असताना मी बरोबर आहे तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असे सांगून बघत बसणारे त्या टिमसाठी घातक मेंबर ठरतात ...

  • मी हे करु शकतो आणि मीच करणार, फक्त माला या कामात थोडी मदत करा असे म्हणून कार्य करणारे ग्रेट असतात ...

TEAM या शब्दाचा अर्थ .....
T = Together ....
E = Everyone ...
A = Achieves ...
M = More ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या