डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 मोटिव्हेशनल सुविचार


20 व्या शतकातील श्रेष्ट चिंतक, तेजस्वी लेखक आणि भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ बाबासाहेब अंबेडकर यांचा भारतीय संविधान निर्मितीत प्रमुख वाटा आहे.त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते. म्हणून आज बाबा साहेबांचे विचार तुमच्या साठी घेऊन अलोय.


"अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही."


"काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."


"जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो."


"जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो."


"माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची."


"मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते."


"शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र  क्षेत्र आहे."


"शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !"


"शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे."


"सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे."



हे विचार आवडले का आवडले असतील तर कमेंट करुन कळवा. आमचे फेसबुक पेज लाईक करा अणि असे चांगले विचार मिळवा.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. युवा पीढी ने वाचुन विचार करुन समाजा मध्ये राहील पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  2. मा. श्री.विपीन विजय भालेराव१४ एप्रिल, २०१९ रोजी ७:०५ AM

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजा साठी किती संघर्ष केला आणि न्याय मिळवून दिला .....परंतु आज तोच समाज काय करत आहे जरा विचार केला पाहीजे.

    उत्तर द्याहटवा