शरद पवार जीवन चरीत्र marathi biography

शरद गोविंदराव पवार

शरद पवार (sarad pawar) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून फुटून इ.स. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

प्रारंभिक जीवन

पवारांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी पुणे जिल्ह्यातीलबारामती येथे झाला. इ.स. १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनीगोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.


विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले.


वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
 शरद पावर यांचा दुर्मिळ फोटो


विधानसभा

सर्वप्रथम इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत तेबारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री.वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून वयाच्या २९व्या वर्षी समावेश झाला.

१९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले.
शरद पवार बाळासाहेबांन सोबत

मुखमंत्री


१८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्षयांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते.

या नंतर ते इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातीचे मुख्यमंत्री होते.


राष्ट्रवादी पक्ष स्थापना


 १० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.

शरद पवार साहेबांबद्दल बरेच काही आहे आणखी जे मी वर वेळे अभावी लिह्लो नाहीये. तरी तुम्हाला अधिक जाणून घायचे असेल तर खाली दिलेले पुस्तक वाचून माहिती मिळवू  शकता धन्यवाद.
चरित्रे आणि आत्मचरित्रसंपादन करा

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या