जगातील 10 सर्वात महागडे कार, किंमती ऐकून थक्क व्हाल.

महागडे कार


कार चे वेड बहुतेक सर्वाना असते. सध्या ते फक्त दळणवळणाचा साहित्य नसून एक प्रतिष्ठेची गोष्ट बनली आहे. श्रीमंती दाखवायलाच आजकाल लोक गाड्यांचा उपयोग करत आहेत. यातच काही श्रीमंत मंडळींना महागडे कार बाळगणाची सवय असते. भारतातिल पण काही खेळाडू, अभिनेता, राजकारणी, बिजनेस मॅन इत्यादी लोकांमध्ये हि सवय आढळते. महागडे कार वापरण्याचे प्रमाण युरोप, अमेरिका मध्ये थोड जास्तच आहे. या मुळेच आज आपण बघणार आहोत श्रीमंत लोकांच्या या 10 महाग खळण्यान बद्दल.

लैंबॉर्गिनी एलपी 770-4(Lamborghini Centenario LP 770-4)


किंमत:$1.9 million doller (12.64 करोड़ रु )


ही गाडी लैंबॉर्गिनी चे संस्थापक फेरुचियो लैंबॉर्गिनी यांचा 100 व्या जयंती निमित्त बनवण्यात आली होती . ह्या गाडीचे इंजन 6.5 लीटर चे असून हा 770 हॉर्सपावर ची शक्ती गाडीला प्रधान करतो. हा 2.8 सेकंदात 100 किमी ची स्पीड पकडू शकतो. यांची टॉप स्पीड आहे 362 किमी दर ताशी. अश्या फक्त 20 गाड्या विक्री साठी उपलब्ध आहेत.


कोएनिग्सेग रेगेरा (Koenigsegg Regera)


किंमत:$2 million doller (13.30 करोड़ रु )


कोएनिग्सेग रेगेरा मध्ये 5.0 लीटर च्या ट्वीन इंजन आहे. जो 1,500 हॉर्स पावर्स एवढी जबरदस्त क्षमतेचा आहे. या शानदार कार चे वजन 1,470 किलोग्राम आहे. रेगेरा 0 ते 300 किलोमीटर प्रति घंटा ची स्पीड फक्त 10.9 सेकंड्स मध्ये पकडू शकते. तर याची टॉप स्पीड 400 किलोमीटर दर तशी पकडायला याला फक्त 20 सेकंड्स लागतात.


कोएनिग्सेग वन (Koenigsegg One)


किंमत:$2 million doller(13.30 करोड़ रु)

 कोएनिग्सेग वन हा एक लिमिटेड एडिशन कार आहे. कंपनी ने अश्या फक्त 6 कार्स बनवले आहेत. हा कार 1:1 म्हणजे 1 किलो ला एक हॉर्स पॉवर या तत्वा वर बनलेलं आहे. म्हणूनच याचे वजन 1340 किलो असून याच इंजीन 1340 हॉर्स पॉवर चे आहे. म्हणून सध्या तरी हा जगातील सर्वात वेगवान कार आहे. यात फॉर्म्युला वन कार मधील सर्व वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. याची टॉप स्पीड 439 किलोमीटर प्रति घंटा एवढी आहे.

बुगाटी शिरोन(Bugatti Chiron)


किंमत:$2.5 million doller (16.63 करोड़ रु )


बुगटी कंपनी ही आकर्षक आणि वेगवान कार बनवण्या साठी प्रसिद्ध आहे. शिवाय यांचा गाड्या हे खूप महाग पण असतात. बुगटी शिरोन ची खास गोष्ट म्हणजे यात 8 लिटर चे जबरदस्त इंजन आहे. या इंजन मध्ये 16 सिलेंडर आहेत, ज्या या गाडीला 15,00 हॉर्सपॉवर एवढी शक्ती प्रधान करते. हा फक्त 2.5 सेकंड्स मध्ये 100 किमी पर्यंत वेग पकडू शकतो. याची टॉप स्पीड आहे 420 किलोमीटर प्रति घंटा.

फेरारी एफ60 अमेरिका (Ferrari F60 America)


किंमत: $2.5 million (16.63 करोड़ रु)फेरारी च्या अमेरिका मध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल कंपनी ही गाडी बनवली होती. अश्या फक्त 10 गाड्याच बनवण्यात आल्या होत्या. या गाडीचा रंग आणि मधील इंटिरियर हे अमेरिकन झंड्या सारखा बनवलेले आहेत. यात 6.5 लिटर इंजीन असून हा 740 हॉर्स पॉवर क्षमता निर्माण करतो. हा 100 किमी फक्त 3.1 सेकंड्स मध्ये पकडतो.

पगानी हुआयरा बीसी (Pagani Huayra BC)


किंमत:: $2.6 million(17.29 करोड़ रु)या गाडीचे नाव हवेच्या देवतेच्या नावावर ठेवण्यात आले आहे. याला मागच्या वर्षीच जेनेव्हा मोटार शो मध्ये दाखवलं गेलं होतं. या लिस्ट मधील सर्वात वजनदार गाडी आहे ही. पगानी कंपनी ने अश्या फक्त 20 कार बनवले आहेत. टेक्नॉलॉजी बाबतीत यात 789 हॉर्सपावरचा इंजीन आहे. यात 12 सिलेंडर चा इंजीन आहे. वजनाला जास्ती असून देखील ही कार 100 किमी चा टप्पा फक्त 3 सेकंड्स मध्ये पकडतो.

बुगाटी वेयरॉन विवेरे ( Limited Edition Bugatti Veyron by Mansory Vivere)


किंमत: $3.4 million ( 22.16 करोड़ रु )ही लिस्ट या कार शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कार विशेषज्ञ याला कलेचा एक अदभूत नमुना असे सांगतात. ही जगातील सर्वात वेगवान कार आहे. यात वापरले गेलेले LED पासून, बॉडी कॅबिन, इंटेरियर इत्यादी सर्व जगातील सर्वश्रेष्ठ डिजनर्स नी बनवलेलं आहे. यात 1200 हॉर्स पॉवर चा इंजीन असून हा 386 किलोमीटर एवढा वेग पकडू शकतो.

डबल्यू मोटर्स लाइकान हाइपरस्पोर्ट (W Motors Lykan Hypersport)


किंमत:: $3.4 million (22.16 करोड़ रु )ही कार फास्ट अँड फ्यूरियस 7 या सिनेमा मध्ये दिसली होती. या कारच्या बल्ब मध्ये हिरे जडवण्यात आले आहेत. या कारच्या सीट वर सोन्याचा थर चढवलेला आहे. एवढी महाग कार असुन देखील दुबईचे पोलीस याचा उपयोग करतात, या गाडीला ते गस्त घालण्यासाठी वापरतात. यात 3.7 लिटर चा इंजीन वापरले गेले आहे. जो 770 हॉर्स पॉवर क्षमता निर्माण करतो. हा 2.8 सेकंड्स मध्ये 100 किलोमीटर प्रति घंटा, एवढे वेग पकडतो. याची टॉप स्पीड 390 किमी एवढी आहे.

लैंबॉर्गिनी वेनेनो (Lamborghini Veneno)


किंमत: $4.5 million (29.93 करोड़ रु)ही कार लैंबॉर्गिनी कंपनी चे 50 वर्ष पूर्ण झाल्या निमित्य बनवण्यात अली आहे. ही या कंपनी ने आज पर्यंत बनवलेली सर्वात चांगली व महागडी कार आहे. ही कार लुक्स मध्ये या लिस्ट मधील सर्वात चांगली कार आहे. टेक्नॉलॉजी बाबतीत देखील हि बेस्ट कार आहे. यात 6.5 लिटर इंजीन असून 740 हॉर्सपॉवर एवढी क्षमता निर्माण करू शकतो. ही कार 2.9 सेकंड्स मध्ये 100 किलोमीटर प्रति घंटा एवढे वेग पकडू शकेल.ह्या कार ची टॉप स्पीड 354 किलोमीटर प्रति घंटा एवढी आहे.

सीसीएक्सआर त्रेविता (Koenigsegg CCXR Trevita)


किंमत: $4.8 millions (31.93 करोड़ रु)कोएनिग्सेग या प्रसिद्ध कंपनी ने बनवलेला CCXR त्रेविता ही गाडी जगातील सर्वात महाग गाडी. ही गाडी एवढी महाग आहे कारण यात गाडी कलर करण्या साठी वापरण्यात आलेल्या पेंट मध्ये हिऱ्यांची धूळ diamond dust) वापरली गेली आहे. अश्या बऱ्याच ठिकाणी कंपनी ने महागडे वस्तू वापरलेले आहेत.

टेक्नॉलॉजी बाबतीत बोलायचे तर ही एक भविष्यातील कार आहे. यात 4.8 लिटर, इंजीन असून हा 1004 हॉर्सपावर क्षमता निर्माण करू शकतो. हा फक्त 2.9 सेकंड्स मध्ये 100 किलोमीटर प्रति घंटाची स्पीड पकडू शकते. या कार ची टॉप स्पीड 410 किलोमीटर प्रति घंटा आहे.

तुम्हाला कोणती गाड़ी आवडली? कमेन्ट मधे सांगा, अणि atoz marathi ला फेसबुक वर लाईक करा धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या