व्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय ( व्यापक शिक्षण )? comprehensive teachingstory

व्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय?


( व्यापक शिक्षण )

काही प्राण्यांनी जंगलात शाळा सुरू करायचे ठरवले. एक पक्षी, खारूताई, मासा, कुत्रा, ससा आणि मंदमती ईल मासा हे त्या शाळेत शिकणार होते. शाळा चालवण्यासाठी एक समिती स्थापन केली. व्यापक पाया असलेले शिक्षण देणारा ( व्यापक शिक्षण ) अभ्यासक्रमही तयार करण्यात आला. हवेत उडणं, झाडावर चढणं, पोहणं, जमिनीत बीळ करणं यासारख्या विषयांचा समावेश करून सर्व प्राण्यांना त्यांचा अभ्यास अनिवार्य करण्यात आला.

पक्ष्याला उडण्यात उत्तम गती होती, पण बीळ तयार करताना त्याची चोच तुटली, पंख झडले. हवेत उड्डाण करताना तो मागे पडू लागला. झाडावर चढणे आणि पोहणे यात तो नापास झाला. मासा हा उत्तम पोहणारा असून पाण्याबाहेर मात्र निघू शकत नव्हता. त्या मुळे इतर सर्व विषयांत त्याला नापास व्हावे लागले. खारुताई झाडावर चढण्यात प्रवीण असली तरी पोहण्यात अयशस्वी ठरली.

कुत्र्याने शाळेत प्रवेशच घेतला नाही. त्याने फी भरण्यास नकार देऊन शाळेच्या प्रशासनाने अभ्यासक्रमात भुंकण्याचा समावेश न केल्याबद्दल वाद घातला. सशाला बिळं खोदण्यात प्रथम श्रेणी मिळाली पण त्याला झाडावर चढता येईना. तो एकसारखा खाली पडू लागला. डोक्यावर आढळल्यामुळे त्याच्या मेंदूला मार लागला आणि बीळ तयार करण्यात देखील त्याला अखेर तिसरी श्रेणी मिळाली.

मतीमंद ईल माशाची प्रत्येक गोष्टच अर्धवट असे. पण शेवटी तोच सर्वात यशस्वी ठरला व निरोपाचे भाषण करण्याचा मान त्याला मिळाला. प्रत्येक विद्यार्थाला व्यापक पाया असलेलं शिक्षण ( व्यापक शिक्षण ) मिळावं हे उद्दिष्ट साध्य झालं म्हणून शाळेच्या नियामक समितीला आनंद झाला.

सध्याचे व्यापक पाया असलेलं शिक्षण हे वरील उदाहरणा वरून समजता येईल. परंतु याला व्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणता येईल का? त्याची व्याख्या काहीशी अशी करता येईल.

प्रत्येक विद्यार्थ्याची विशिष्ट विषयातील नैसर्गिक गती किंवा क्षमता कायम ठेवून त्याची जीवन जगण्यासाठी सर्वांगीण तयारी करून घेणारे शिक्षण म्हणजे खरे व्यापक पाया असलेले शिक्षण ( व्यापक शिक्षण ).

.कसा वाटला हा लेख आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेज लाईक करून आम्हाला प्रोत्साहन द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या