बोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा

चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा.

एका गावामधे चित्रकार होता. त्यानं एक मोठं चित्र काढलं. मोठं पोस्टरच होतं ते. ते गावातल्या एका प्रमुख चौकात ठेवलं. तिथं एक सूचना लिहिली, या चित्रात बघणाऱ्याला काही चूक आढळल्यास सोबतच्या वहीत ती लिहावी. पुष्कळ लोक आले. चित्र बघून त्यांनी हवी ती सूचना लिहिली.

वही अगदी भरून गेली. एका चित्रात इतक्या चुका, कसं शक्य आहे ते?

तो पुरता गोंधळून गेला. आपली शंका दूर करण्यासाठी तो आपल्या गुरुकडे गेला. झालेला प्रकार त्याने आपल्या गुरुच्या कानी घातला. त्यावर गुरुने सांगितले, आता असे कर, ते चित्र पुुन्हा चौकात ठेव. त्याच्या शेजारी रंग व ब्रश ठेव आणि सूचना लिही की, "ज्याला कोणाला या चित्रात चूक दिसेल, दोष दिसेल त्याने तो ब्रशने दुरुस्त करावा.' चित्र सुधारण्यासाठी एकही माणूस पुढे आला नाही. ते चित्र आहे तसेच राहिले. आमच्या समाजाला दुसऱ्याच्या चुका तेवढ्या दिसतात. दोष दिसतात पण त्या सुधारण्यासाठी कोणी पुढे येत नाही ही आमच्या समाजाची जी प्रवृत्ती आहे ती बदलली पाहिजे.

तात्पर्य : चुका काढणे जितके महत्वाचे तितकेच त्या सुधारणे महत्वाचे असते.
कॉपी पेस्ट पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या